Video : थारमधील बदमाशांनी पल्सरवरुन चाललेल्या कपलला भर रस्त्यात मधलं बोटं दाखवलं, तरुणालाही मारहाण; संतापलेल्या तरुणीने..
हे दृश्य त्या जोडप्यासाठी अत्यंत वेदनादायी होते आणि तरुण पूर्णपणे असहाय्य वाटला. या जोडप्याने तत्काळ पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला मात्र अनेकदा फोन करूनही पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही

Jaipur Viral Video : जयपूरच्या मानसरोवर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थारमध्ये बसलेल्या काही बदमाशांनी एका जोडप्याला मधलं बोट दाखवलं आणि नंतर पल्सरवरून चाललेल्या तरुणाला सुद्धा बेदम मारहाण केली. थारमध्ये बसलेल्या बदमाशांनी या जोडप्याला मधलं बोट दाखवूनही त्यांनी काहीही न बोलता या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. मात्र, थारमध्ये बसलेला एक तरुण पुन्हा त्या जोडप्याजवळ आला आणि पल्सरवरील तरुणाला बेदम मारहाण करू लागला. ही घटना शनिवारी रात्री 10.45 च्या सुमारास धन्वंतरी हॉस्पिटलजवळ असल्याची माहिती आहे.
'तुझ्या घरात आई-बहीण नाही का?'
हे दृश्य त्या जोडप्यासाठी अत्यंत वेदनादायी होते आणि तरुण पूर्णपणे असहाय्य वाटला. या जोडप्याने तत्काळ पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला मात्र अनेकदा फोन करूनही पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. यावेळी, सोबत असलेल्या असलेल्या तरुणीने शौर्य दाखवले आणि व्हिडिओमध्ये ती बदमाशांशी भांडताना दिसत आहे. तरुणीने ओरडून 'तुझ्या घरात आई-बहीण नाही का?'
यह जयपुर है...
— Arvind Chotia (@arvindchotia) February 15, 2025
थार में बैठे लड़कों ने कपल को मिडल फ़िंगर दिखाई। फिर भी बाइक वाला लड़का कुछ नहीं बोला। थार वालों ने कपल के आगे थार गाड़ी लगा दी और लड़के को जमकर पीटा। घटना 10:45 पर मानसरोवर के धन्वंतरि हॉस्पिटल के पास की है। पुलिस को कई फोन किए मगर लगे नहीं !
मनचलों से उलझ रही यह… pic.twitter.com/Kk6n7Gojg0
लोकांनी या घटनेचा निषेध केला
या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक लोक या घटनेचा निषेध करत आहेत आणि जयपूर पोलिसांनी या मुलांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, 'या मुलांना योग्य वागणूक द्यायला हवी. जयपूरसारख्या आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या शहरावर हे घटक वाईट डाग आहेत.
कडक कारवाईची मागणी
जयपूर पोलिसांनी आता या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून अशा बदमाशांचे परत धाडस होणार नाही आणि महिलांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वाटू शकेल. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरने जयपूर पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























