Arshad Nadeem : वडिलांनी मजुरी केली, गावकऱ्यांनी वर्गणी काढून पैसे जमवले, अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकत संधीचं सोनं केलं
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकलं तर भारताच्या नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकलं.
Paris Olympics 2024 Arshad Nadeem पॅरिस: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं सुवर्णपदक जिंकलं. तर नीरज चोप्रानं रौप्य पदक जिंकलं.अर्शद नदीमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत 92.97 मीटर एवढ्या अंतरावर भाला फेकला. ऑलिम्पिकच्या इतिहासात या अंतरावर भाला फेकणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. अर्शद नदीमचा पॅरिस ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला कठोर मेहनत करावी लागली. अर्शद नदीमचे वडील मजुरी करतात. नदीमला प्रशिक्षण देण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी गावकऱ्यांनी वर्गणी काढून रक्कम जमा केली होती. नीरज चोप्राला अर्शद नदीम गुरु मानतो. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोघे पदकासाठी आमने सामने होते.
अर्शद नदीमनं पाकिस्तानला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. नदीमचा हा प्रवास संघर्षपूर्ण होता. सुरुवातीच्या काळात नदीमकडे चांगला भाला देखील नव्हता. नदीमनं या वर्षाच्या सुरुवातीला एक चांगला भाला देण्याची मागणी मागणी केली होती. नदीमच्या यशामुळं त्याचे वडील देखील खुश आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं इतिहास घडवत सुवर्णदक मिळवलं. याशिवाय ऑलिम्पिक रेकॉर्ड देखील केलं. अर्शद नदीमनं फेकलेला भाला 92.97 मीटर अंतरावर फेकला. भारताच्या नीरज चोप्रानं 89.45 मीटर अंतरावर भाला फेकला. तर, ग्रेनाडाच्या पीटर्स अँडरसननं कांस्य पदक जिकंलं.
नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये सवर्णपदक जिकंलं होतं. यामुळं कोट्यवधी भारतीयांना नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची आशा होती. मात्र, नीरज चोप्रा दुखापतग्रस्त असल्याचा त्याचा कामगिरीवर परिणाम झाला. त्याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकता आलं.
भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती पदकं जिंकली?
भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत पाच पदकं जिंकली आहेत. यामध्ये एक रौप्य पदक आणि चार कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताला नेमबाजीत तीन कांस्य पदकं मिळाली. तर, हॉकी संघानं सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं. मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्य पदक जिंकलं. यानंतर मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर मिश्र दुहेरी एअर पिस्टल नेमबाजीत कांस्य पदक जिंकलं. यानंतर कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे यानं कांस्य पदक जिकलं. भारतीय हॉकी संघानं कांस्य पदकाच्या लढतीत स्पेनचा 2-1 नं पराभव करत कांस्य पदकावर नाव कोरलं. तर, नीरज चोप्रानं अखेर रौप्य पदक मिळवलं आहे. भारताला अजून एक पदक मिळण्याची शक्यता आहे. अमन सहरावत याला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.
संबंधित बातम्या :
नीरजनं रौप्य जिंकलं; पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं पदकांचा दुष्काळ संपवला, सुवर्ण जिंकत रचला इतिहास