क्रीडा जगतात पाकिस्तानची नाचक्की; दिग्गज कुस्तीपटूकडून काढून घेतले जिंकलेले मेडल, जाणून घ्या प्रकरण
Pakistani wrestler Ali Asad News : पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानी कुस्तीपटू अली असदवर डोपिंग प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यामुळे 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
Pakistani wrestler Ali Asad News : पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानी कुस्तीपटू अली असदवर डोपिंग प्रकरणात खेळाडू दोषी आढळल्यामुळे 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. यासोबत त्याचे राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलेले कांस्यपदक हिरावून घेण्यात आले आहे.
पाकिस्तान कुस्ती महासंघने (PWF) पुष्टी केली की अली असदवर केवळ 4 वर्षांची बंदी घालण्यात आली नाही तर 2022 मध्ये बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने जिंकलेले कांस्य पदक देखील काढून घेण्यात आले आहे.
पाकिस्तान कुस्ती महासंघ (PWF) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सी (ITA) च्या तपासणीत अली असदने स्पर्धेदरम्यान कामगिरी वाढवणारी औषधे घेतल्याचे समोर आले आहे.
आयटीएच्या तपासणीनंतर, या आठवड्यात असदवर 4 वर्षांची बंदी घालण्याचा आणि त्याचे राष्ट्रकुल खेळातील पदक हिसकावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दिलेल्या मुदतीत असदने आरोपांना उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
मात्र, पाकिस्तानातील ही पहिली आणि एकमेव घटना नाही. याआधी अनेक पाकिस्तानी वेटलिफ्टर्स आणि कुस्तीपटूंना डोपिंग अयशस्वी ठरल्यानंतर अशाच प्रकारच्या बंदीचा सामना करावा लागला आहे. या वर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने (IWF) चार पाकिस्तानी लिफ्टर्सवर डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 4 वर्षांची बंदी घातली होती. 10 नोव्हेंबर 2021 रोजी इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सी (ITA) टीमला नमुने देण्यास नकार दिल्यानंतर अब्दुर रहमान, शर्जील बट, गुलाम मुस्तफा आणि फरहान अमजद यांना 2022 मध्ये निलंबित करण्यात आले होते.
CAS मध्ये याचिका केली होती दाखल
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट प्रमाणेच पाकिस्तानच्या या चार भारोत्तोलकांनी आपल्या बचावासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स म्हणजेच CAS मध्ये याचिका दाखल केली होती, परंतु पाकिस्तानी वेटलिफ्टर्सवरील निलंबन कायम आहे.
हे ही वाचा -
PAK VS BAN 2nd Test : पाकिस्तानच्या घरात घुसून बांगलादेशनं कापलं नाक, रचला इतिहास, मालिका खिशात