Babar Azam Test Retirement : सही ऐवजी अंगठा, निवृत्तीची घोषणा, बाबर आझमच्या नावे फिरणाऱ्या पोस्टमागील सत्य काय?
Babar Azam retirement : बांगलादेशने दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा पराभव केला आहे. यासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला आहे.
Babar Azam Test Retirement : बांगलादेशने पाकिस्तानमध्ये इतिहास रचला आहे. बांगलादेशने दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा पराभव केला आहे. यासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला आहे. या मालिकेत माजी कर्णधार बाबर आझमची बॅट चालली नाही. बाबरची कामगिरी पाहता त्याच्या बॅटला गंज लागल्यासारखे वाटत आहे.
बाबर आझमने पाकिस्तानसाठी गेल्या 16 कसोटी सामन्यांमध्ये 50 धावांचा टप्पाही गाठलेला नाही. शेवटच्या 16 कसोटी डावांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी फक्त 20.68 आहे. त्याच्या बॅटमधून केवळ 331 धावा आल्या आहेत आणि त्यातील सर्वोत्तम धावसंख्या 41 आहे. बाबरची ही कामगिरी पाहून चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.
बाबर आझमची कसोटीतून निवृत्तीची घोषणा?
दरम्यान, बाबर आझम यांच्या निवृत्तीबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे की, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. जेव्हा मी पाकिस्तान संघाचा कर्णधार होतो, तेव्हा मी क्युरेटरला फलंदाजीच्या परिस्थितीनुसार खेळपट्टी तयार करण्यास सांगायचो जेणेकरून मला चांगली खेळी खेळता येईल. पाकिस्तान कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधारपद शान मसूदकडे सोपवण्यात आल्यापासून मला कसोटी क्रिकेटमध्ये पन्नासचा आकडाही स्पर्श करता आलेला नाही.
या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, 'शान मसूदच्या कर्णधारपदानंतर पिच क्युरेटर माझ्यानुसार खेळपट्टी बनवत नाहीत, त्यामुळे मी धावा करू शकत नाही आणि माझी रँकिंग दिवसेंदिवस घसरत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मी फक्त रेकॉर्ड आणि आकडेवारीसाठी खेळतो. पण मी तुम्हा सर्वांना वचन देतो की आमचा संघ नेपाळ आणि झिम्बाब्वेसारख्या संघांविरुद्ध खेळेल तेव्हा मी पुनरागमन करेन. या पोस्टच्या शेवटी बाबर आझम यांचे नाव लिहिले आहे आणि त्याखाली स्वाक्षरीच्या जागी अंगठा आहे.
Bye bye test cricket👋 pic.twitter.com/5v5kDKgqs6
— Babar Azam - Parody (@babarazam228) September 2, 2024
पोस्टमागील सत्य काय?
बाबर आझमची फिरकी घेण्यासाठी चाहत्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. बाबर आझम यांनी अद्याप निवृत्तीची कोणतीही घोषणा केलेली नाही. बाबरच्या कसोटीतील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, बाबरला गेल्या 16 डावांत एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्याचे शेवटचे शतक 26 डिसेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध कराचीच्या सपाट विकेटवर आले होते. ज्यात त्याने 161 धावा केल्या होत्या. यानंतर बाबरने एकदाच 40 चा टप्पा ओलांडला आहे.
बाबरची लाजिरवाणी कामगिरी
रावळपिंडी येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेत बाबरने पहिल्या डावात 0 धावा आणि दुसऱ्या डावात 22 धावा केल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यात बाबरने पहिल्या डावात 31 धावा आणि दुसऱ्या डावात केवळ 11 धावा केल्या.
हे ही वाचा -