एक्स्प्लोर

कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर

दिपाली पाटील ही नृत्यांगना जीवानिशी गेली असताना, राजकारण्यांना मात्र आयते कोलीत मिळाल्याने ते या प्रकरणाचा राजकीय फायदा उठवताना दिसत आहेत.

अहिल्यानगर : जिल्ह्यातील जामखेड (Ahilyanagar) येथील तपनेश्वर भागात राहणाऱ्या आणि कला केंद्रात नृत्यांगना (Dancer) म्हणून काम करणारी दिपाली पाटील हिने दोन दिवसांपूर्वी जामखेडच्या खर्डा रोडवरील साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, भाजपशी निगडीत असलेल्या संदीप गायकवाड याने दिपाली पाटील हिला सातत्याने लग्नाचा तगादा लावल्यानेच दिपालीने आत्महत्या केल्याचा आरोप तिची आई दुर्गा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत केला आहे. त्यावरुन, आता राजकीय (Politics) वातावरणही तापले असून संबंधित कला केंद्राचे मालक अरविंद जाधव यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. दिपाली अत्यंत गरीब होती, तिने तीन महिन्यांपूर्वीच कला केंद्र सोडले होते, असे जाधव यांनी सांगितले.

दिपाली पाटील ही नृत्यांगना जीवानिशी गेली असताना, राजकारण्यांना मात्र आयते कोलीत मिळाल्याने ते या प्रकरणाचा राजकीय फायदा उठवताना दिसत आहेत. कारण, याप्रकरणातील आरोपी संदीप गायकवाडची पत्नी लता गायकवाड यांनी नुकतेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून प्रभाग 5 ब मधून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आहे. संदीप गायकवाड हा स्वतः विवाहित असताना तो दिपालीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. त्यामुळे दिपालीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचारात रोहित पवार यांनी भाजपवर टीका करताना नगरपरिषद निवडणुकीत भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली असल्याचे वारंवार म्हटलं होतं. त्यातच आता त्यांच्याच उमेदवाराच्या पतीने दबाव टाकल्याने एका नर्तिकेना आत्महत्या केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. रोहित पवारांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणावर राज्यातील इतरही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून हे घटना दुर्दैवी असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सोबतच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं राजकीय नेत्यांनी म्हटलं आहे.

दिपाली विवाहित, दोन मुलांची आई

दिपाली पाटील ही मुळची कल्याण येथील रहिवाशी होती, तिचा विवाह झाला असून तिला दोन मुलं होती. मात्र, नवऱ्यासोबत मतभेद झाल्याने ती स्वतंत्र राहत होती, तिचे दोन्ही मुलं हे कल्याण येथे आजीसोबत राहत आहेत. तर घरातील आर्थिक परिस्थिती बेताच्या असल्याने तिने कला केंद्रात काम करणं पत्करलं. काही दिवसांपासून ती संदीप गायकवाडच्या संपर्कात होती आणि संदीप गायकवाड हा तिला लग्नासाठी दबाव टाकत होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी ती बाजारात जाऊन येते असे सांगून बाहेर पडली. परंतु अनेक तास उलटूनही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. दिपाली ज्या रिक्षाने गेली त्या चालकाकडून चौकशी केली असता, त्याने तिला साई लॉज येथे सोडल्याचे सांगितले. मैत्रिणी सायंकाळी लॉजमध्ये पोहोचल्या असता रुम आतून लॉक होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपालीने पंख्याला गळफास घेतल्याचे आढळले. दिपाली ज्यावेळेला लॉजवर गेली होती त्या वेळेला संदीप देखील त्या ठिकाणी आला होता हे सीसीटीव्हीतून समोर आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली आहे

संदीप गायकवाड आधी राष्ट्रवादीत

संदीप गायकवाड हा जरी सध्या भाजपमध्ये असला तरी तो यापूर्वी राष्ट्रवादी पक्षात होता. तो आणि त्याची पत्नी लता गायकवाड हे दोघेही माजी नगरसेवक आहेत. संदीप गायकवाड याच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून तो याच निवडणुकीत भाजपमध्ये गेला. मात्र, दिपाली पाटील आत्महत्या प्रकरणात त्याचे नाव आले आणि त्याच्यासह भाजप पक्षालाही टिकेचं धनी व्हावे लागलं.

दिपालीने तीन महिन्यांपूर्वीच कला केंद्र सोडले

दरम्यान, दिपाली पाटील ही अतिशय गरीब कुटुंबातील असून उदरनिर्वाह भागवण्यासाठी जामखेड येथील कला केंद्रावर काम करत होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून तिने घुंगरू हे कला केंद्र सोडून दिल्याचं घुंगरू कला केंद्राचे चालक अरविंद जाधव यांनी सांगितलं. दिपाली पाटील या मूळच्या कल्याणमधील आहेत त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे दोन-तीन महिन्यांपूर्वी आमच्या कला केंद्रात आल्या होत्या. सध्या त्या आमच्याकडे नव्हत्या. दिपाली पाटील परिस्थितीने खूप गरीब होत्या, असेही जाधव यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Bollywood: बॉलीवूड इंडस्ट्री भीतीच्या सावटाखाली? कलाकारांची पोलिसांकडे धाव, पडद्यावरील सुपरहिरोंना X-कॅटेगरी सुरक्षा मिळणार?
बॉलीवूड इंडस्ट्री भीतीच्या सावटाखाली? कलाकारांची पोलिसांकडे धाव, पडद्यावरील सुपरहिरोंना X-कॅटेगरी सुरक्षा मिळणार?
फक्त एक हजार रुपयात मन घातलं, तलाठ्याला रंगेहात पकडलं, धुळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई 
फक्त एक हजार रुपयात मन घातलं, तलाठ्याला रंगेहात पकडलं, धुळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई 
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
नगरपरिषदेच्या छतावर अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची ओली पार्टी; मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
Nagpur Robbery News : नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?
नागपुरात मध्यरात्री धाडसी दरोड्याचा थरार! जालन्याच्या व्यापाऱ्याला लुटलं; कारमधून पावणे 4 कोटींची रोकड पळवली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
Embed widget