एक्स्प्लोर

जोकोविचला यूएस ओपनचं विजेतेपद, सॅम्प्रसच्या विक्रमाची बरोबरी

टेनिसस्टार नोवाक जोकोविचने अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोचा पराभव करुन तिसऱ्यांदा यूएस ओपनची ट्रॉफी उंचावली.

न्यूयॉर्क : सर्बियन टेनिसस्टार नोवाक जोकोविचने अमेरिकन ओपनमधील पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोचा पराभव करुन जोकोविचने तिसऱ्यांदा यूएस ओपनची ट्रॉफी उंचावली. 14 वं ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवत नोवाकने अमेरिकेचे दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रस यांच्या विक्रमाची जोकोविचने बरोबरी केली. जोकोविचने 6-3, 7-6 (7-4), 4-3 अशा सरळ सेट्समध्ये पोत्रोला धूळ चारली. पहिल्या सेटमध्ये जोकोविचने पोत्रोवर निर्विवाद वर्चस्व मिळवलं होतं. मात्र दुसऱ्या सेटमध्ये पोत्रोने कडवी झुंज देत जोकोचं घामटं काढलं. दुसरा सेट शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक होत गेला, अखेर टायब्रेकरमध्ये जोकोविचने सेट खिशात घातला. तिसऱ्या सेटची सुरुवात जोकोविचने चांगली केली असली, तरी पोत्रोने 3-3 ने बरोबरी करत जोकोविचला पुन्हा झुंजवलं. अखेर चौथा आणि पाचवा गेम जिंकत जोकोविचने पोत्रोला आपणच बादशाह असल्याचं दाखवून दिलं. 14 वं ग्रँड स्लॅम विजेतेपद जोकोविचचं हे तिसरं अमेरिकन ओपन, तर 14 वं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. जोकोविचने 2011 आणि 2015 साली अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्याशिवाय, त्याच्या नावावर सहा ऑस्ट्रेलियन ओपन, चार विम्बल्डन आणि एक फ्रेंच ओपन जमा आहेत. यंदाच्या हंगामातील सलग दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद काबीज करत जोकोविचने शेवट गोड केला. यंदाचं विम्बल्डन विजेतेपदही जोकोविचने पटकावलं होतं. पीट सॅम्प्रस यांच्या विक्रमाची बरोबरी अमेरिकेचे दिग्गज टेनिसपटू पीट सॅम्प्रस यांच्या विक्रमाची जोकोविचने बरोबरी केली. सॅम्प्रस यांनी 14 ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याचा विक्रम रचला होता. रॉजर फेडरर (20 ग्रँडस्लॅम जेतेपद) राफेल नादाल (17) हे दोघं या यादीत अव्वल आहेत. अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोविचने जपानच्या केई निशीकोरीला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. राफेल नदालने गुडघ्याच्या दुखापतीमुळे पोत्रोविरुद्धच्या उपांत्य सामन्यातून माघार घेतली होती. त्यामुळेच पोत्रोला अंतिम फेरी गाठता आली होती. 19 पैकी 15 वेळा जोकोविच'च' गेल्या दहा वर्षांत जोकोविच आणि पोत्रो पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम फायनलमध्ये आमनेसामने आले होते. ते आतापर्यंत 19 वेळा एकमेकांना भिडले असून त्यापैकी 15 वेळा जोकोविच सरस ठरला. 2009 साली पोत्रोने अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं, मात्र यंदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवूनही विजेतेपदाने त्याला हुलकावणी दिली. यूएस ओपनच्या महिला एकेरीत जपानच्या नाओमी ओसाकाने विजेतेपद मिळवलं. टेनिस सम्राज्ञी सेरेना विल्यम्सचा पराभव करुन नाओमीने जेतेपद पटकावलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?

व्हिडीओ

Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
Embed widget