एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आशिया चषक अंडर-19 : नेपाळकडून भारताचा 19 धावांनी पराभव
ग्रुप 'ए'मध्ये सर्वात कमकुवत समजल्या जाणाऱ्या नेपाळनं ही किमया केल्यानं भारताला आशिया चषकाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे.
क्वालालंपूर : आशिया चषक अंडर-19 मालिकेत नेपाळच्या संघाना भारतावर 19 धावांनी मात करत दणदणीत विजय मिळवला. ग्रुप 'ए'मध्ये सर्वात कमकुवत समजल्या जाणाऱ्या नेपाळनं ही किमया केल्यानं भारताला आशिया चषकाच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे.
या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. नेपाळनं 50 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 185 धावा केल्या होत्या. कर्णधार दिप्रेंद सिंह 88 आणि जितेंद्र ठाकूरीनं 33 धावांची खेळी केली.
दरम्यान, 186 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या सलमीवीरांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी 65 धावांची भागीदारीही केली. पण कर्णधार हिमांशू राणा 46 धावांवर बाद झाल्यानंतर भारताचा डाव 48.1 षटकात 166 धावांमध्येच आटोपला. त्यामुळे भारताला नेपाळकडून 19 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement