एक्स्प्लोर

Nitish Kumar Reddy : बुमराह आऊट होताच काळजाचा ठोका चुकला, डीएसपी सिराजचा मास्टरक्लास डिफेन्स अन् नितीशचे पहिलं शतक; एमसीजीवर टाळ्यांचा कडकडाट

आज चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वाॅशिंग्टन सुंदर आणि निती कुमार रेड्डी यांनी दमदार खेळी करत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. वॉशिंग्टन सुंदर 50 धावांवर बाद झाला.

Nitish Kumar Reddy : जेव्हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी त्याची निवड झाली तेव्हा अनेकांच्या त्याच्या निवडीवर शंका उपस्थित केली होती. हा कोण असाच प्रश्न निर्माण करण्यात आली. मात्र, त्याच अवघ्या एकवीस वर्षीय नितीश कुमार रेड्डीनं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर टीम इंडियासाठी मसिहा ठरला. नितीशने एमसीजीवरील पहिल्याच खेळीमध्ये तडाखेबाज शतकाची नोंद केली. त्यामुळे टीम इंडिया पराभवाच्या छायेतून बाहेर पडली आहे. टीम इंडिया अडचणीत असताना नितेश कुमार रेड्डीनं सातत्याने मालिकेमध्ये दमदार खेळी केली आहे. मात्र, त्याचं आजचं पहिलंवहिलं शतक संकटात सापडलं होतं. मात्र, डीएसपी मोहम्मद सिराज त्याच्या मदतीसाठी धावून आला. त्याने केलेल्या तीन चेंडूतील मास्टर क्लास डिफेन्समुळे नितीशला एमसीजीवरील आणि क्रिकेट कारकिर्दीमधील पहिल्या शतकाची नोंद करता आली.

आणि मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली

आज चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वाॅशिंग्टन सुंदर आणि निती कुमार रेड्डी यांनी दमदार खेळी करत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले. वॉशिंग्टन सुंदर 50 धावांवर बाद झाला. त्यामुळे 99 धावांवर नाबाद असलेला नितीश संकटात सापडला होता. 111व्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर वाॅशिंग्टन सुंदर बाद झाला. त्यामुळे प्रत्येकाच्याच मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली.

नितीशच्या शतकाचा मार्ग प्रशस्त करून दिला

त्यानंतर 112 वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स आला. त्याने बुमराहला तिसऱ्या चेंडूवर बाद करत टीम इंडियाला नववा धक्का दिला. त्यामुळे पुन्हा काळजाचा ठोका चुकला. 11व्या क्रमांकावर आलेल्या सिराजवर कमिन्सचे तीन चेंडू खेळण्याचे खडतर आव्हान होते. मात्र, मोहम्मद सिराजने तीन चेंडू अगदी मास्टर क्लास पद्धतीने डिफेन्स करत एक प्रकारे नितीशच्या शतकाचा मार्ग प्रशस्त करून दिला. यावेळी एमसीजीवर टाळ्या वाजवून दाद देण्यात आली. त्यानंतर 113व्या षटकात चौकार मारत नितीशने आपलं शतक पहिलं पूर्ण केलं. त्यामुळे अविस्मरणीय खेळीचा साक्षीदार होण्याचा मान सुद्धा मोहोम्मद सिराजला त्याच्या मास्टर क्लास डिफेन्सने मिळाला. 

नितीशकुमार रेड्डी क्रीझवर आले तेव्हा भारताची धावसंख्या सहा विकेट्सवर 191 धावा होत्या आणि फॉलोऑनचा धोका होता. पण नितीशच्या धाडसी खेळीने भारताला संकटातून सोडवले. नितीश आणि वॉशिंग्टन सुंदरने आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे फॉलोऑन वाचवण्यात रोहित ब्रिगेडला यश आले.

नितीश कुमार रेड्डीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यावर त्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पर्थ कसोटीत पदार्पणातच नितीशने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. नितीशने पर्थ कसोटीत 41 आणि 38* धावा केल्या होत्या. यानंतर त्याने ॲडलेड कसोटीतही दोन्ही डावात 42-42धावा केल्या. गाबा टेस्टमध्ये नितीशच्या बॅटमधून 16 धावा आल्या, त्या खूप मोलाच्या होत्या. त्यानंतर नितीशने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी करून भारताला फॉलोऑन वाचवण्यास मदत केली. मात्र, पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही नितीशला मेलबर्न कसोटीसाठी वगळले जाऊ शकते, अशी चर्चा होती. पण भारतीय संघ व्यवस्थापनाचा या युवा खेळाडूवर विश्वास कायम होता. आता 21 वर्षीय नितीशने मेलबर्न कसोटीत चमकदार कामगिरी करून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 3rd T20 Live Score : आज न्यूझीलंडचा गेम ओव्हर?, श्रेयस अय्यरच्या टीमला मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी, किती वाजता होणार नाणेफेक? जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 3rd T20 Live : आज न्यूझीलंडचा गेम ओव्हर?, श्रेयस अय्यरच्या टीमला मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी, किती वाजता होणार नाणेफेक? जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 3rd T20 Live Streaming : भारताची मालिका विजयाची वेळ आली! न्यूझीलंडविरुद्ध तिसरा टी-20 कधी, कुठे अन् फ्री कसा पाहाल?, जाणून घ्या LIVE स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती
भारताची मालिका विजयाची वेळ आली! न्यूझीलंडविरुद्ध तिसरा टी-20 कधी, कुठे अन् फ्री कसा पाहाल?, जाणून घ्या LIVE स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती
CSK IPL 2027 News : चेन्नई सुपर किंग्सचा असा धमाका की क्रिकेटविश्व हादरलं! CSK मधून एकाच वेळी 5 जणांना नारळ, नेमकं काय घडलं? सगळेच चक्रावले
चेन्नई सुपर किंग्सचा असा धमाका की क्रिकेटविश्व हादरलं! CSK मधून एकाच वेळी 5 जणांना नारळ, नेमकं काय घडलं? सगळेच चक्रावले
IND vs NZ 3rd T20I Weather Report : वेलिंग्टनमध्ये मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा टी-20 रद्द होणार?, जाणून घ्या अपडेट
वेलिंग्टनमध्ये मुसळधार पाऊस! भारत-न्यूझीलंड तिसरा टी-20 रद्द होणार?, जाणून घ्या अपडेट

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
Embed widget