एक्स्प्लोर
VIDEO : थेट कॅमेऱ्यासमोर येत हसिन जहांचे शमीवर गंभीर आरोप
सुरुवातीला फेसबुकवरुन शमीवर आरोप करणाऱ्या हसीनने आता थेट कॅमेऱ्यासमोर येऊन त्याच्यावर निशाणा साधला आहे.
कोलकाता : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर त्याच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला आहे. सुरुवातीला फेसबुकवरुन शमीवर आरोप करणाऱ्या हसीनने आता थेट कॅमेऱ्यासमोर येऊन त्याच्यावर निशाणा साधला आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत. असा थेट आरोप तिने केला आहे.
हसीन जहांचे शमीवर गंभीर आरोप
प्रश्न : थेट सोशल मीडियात तुम्ही शमीबाबत कसं काय या गोष्टी शेअर केल्या?
हसिन जहां : फेसबुकवर पोस्ट टाकण्यासाठी मला शमीनेच भाग पाडलं. त्यामुळे मी हे केलं. आजवर मी विचार केला की, त्याने जे केलं ते केलं... एके दिवशी सारं काही ठीक होईल आणि आमचा संसार पुन्हा सुरळीत होईल. हाच विचार करत-करत माझी पाच वर्ष निघून गेली. पण हे व्यवस्थित होणं तर सोडाच, दिवसेंदिवस परिस्थिती आणखी बिघडत गेली. मला प्रचंड त्रास दिला जाऊ लागला. मला मानसिक आणि शारीरिक त्रासही त्याने दिला.
त्यानंतर मला हे सर्व पुरावे सापडले. दक्षिण आफ्रिकेहून दुबईला येऊन त्याने हॉटेलमध्ये रुम बुक केली आणि पाकिस्तानमधील एका मुलीसोबत अनैतिक संबंधही ठेवले. या सर्व गोष्टीचे पुरावे मिळूनही मी शांतच होती. हे पाहून मी शमीला विचारालं की, ‘हे काय आहे?’ त्यावरही तो माझ्याशी खोटंच बोलत राहिला. एवढंच नाहीतर त्याने मला धमकी दिली. 'तू तुझं आयुष्य नरक करुन घेशील. तुझं आयुष्य अतिशय वाईट होऊ शकतं. सुधर आणि गप्प राहा.'
यावर मी त्याला म्हटलं की, 'तू चूक कबूल कर, माफी माग आणि चांगलं आयुष्य जगण्यास सुरुवात कर.’ आजपर्यंत त्याने मला ना पत्नीचा दर्जा दिला किंवा अधिकार दिले. फक्त आणि फक्त घरातील संसार बघायचा एवढंच मला सांगण्यात आलं.
तो काय करतो, त्याची काय कमाई आहे. त्या कमाईचं तो काय करतो... यापैकी त्याने मला कधीच काहीही सांगितलं नाही. सर्व गोष्टी तो माझ्यापासून लपवून ठेवायचा.
प्रश्न : अनेक क्रिकेटर आपल्या पत्नीला सोबत घेऊन दौऱ्यावर जातात, तू शमीसोबत फार कधी दिसली नाहीस, काही खास कारण?
हसीन जहां : लग्नानंतर त्याने मला कधीच स्वत:हून कुठे बाहेर नेलं नाही. सात एप्रिलला माझं लग्न झालं. त्यानंतर मी त्याला म्हटलं की, मला दुबईला जायचं आहे. त्यावर त्याने अनेकदा मला नकार दिला. त्यावेळी मी त्याच्याशी भांडणही केलं. सर्वांच्या बायका त्यांच्यासोबत जातात. मलाही तुझ्यासोबत यायचं आहे. असं मी त्याला सांगितलं. त्यानंतर मी दुबईला गेली. पुन्हा जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर त्याला जायचं होतं तेव्हाही त्याने हेच नाटक सुरु केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौरा होता तेव्हाही त्याने तसंच केलं. तू सोबत येऊ नकोस, सोबत येऊन तू काय करणार? असे अनेक बहाणे तो करत होता. म्हणजे हे बहाणे करुन तो मला इथे थांबवेल आणि इतर मुलींशी अश्लील चॅटिंग करेल. तो वेश्यांना बोलवायचा आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा. त्यामुळेच तो मला सोबत घेऊन जायचा नाही.
मीही विचार केला की, जर तो असाच विचार करत असेल तर मी तरी जाऊन काय करु. अनेकदा मी भांडणं करुन सोबत गेली. पण त्याचा काही फायदा झाला नाही. दौऱ्यावर मी त्याच्यासोबत गेली तरी तो मला कुठेही शॉपिंग किंवा फिरायला नेत नसे. इतर खेळाडूंच्या पत्नी या शॉपिंगला, फिरायला जायच्या. पण मी याच्यासोबत गेली तर हा रुममधून बाहेर पडण्यासही तयार नसायचा. फक्त रुममध्ये झोपून राहत असे. तेव्हा तो माझ्याशी नीट बोलायचाही नाही.
एक तर तो मॅच खेळण्यासाठी जायचा तेव्हाही मी रुममध्ये एकटीच असायची आणि तो परत आल्यावरही मी तशीच बसून असायची. त्यानंतर मीही विचार केला की, आपण घरीच राहूया. त्याच्यासोबत जायचं नाही.
प्रश्न : फेसबुकवर पोस्ट टाकण्यापूर्वी तू पालकांशी किंवा तुझ्या वकिलांशी काही चर्चा केली होती का?
हसिन जहां : मी सगळ्यात पहिले शमीशीच बोलले. शमी जेव्हा मला धमकी देऊ लागला. त्यामुळे मला नाईलाजाने हे सगळं करावं लागलं. त्याने मला इनडिरेक्टली हे देखील सांगितली की, दुसऱ्या एका तरुणीशीही त्याने लग्न केलं आहे. तुला जे करायचं आहे ते कर. असंही तो मला म्हणाला.
प्रश्न : शमीसोबत पॅचअप करण्याचा प्रयत्न केलात?
हसिन जहां : तो वारंवार मला धमकी देत होता. त्याची चूक असूनही मी सतत पॅचअप करण्याचा प्रयत्न करत होती. त्याचं हे चॅटिंग मिळाल्यावर मी त्याला म्हटलं होतं की, तू माफी माग आणि चांगलं वागायला सुरुवात कर. पण त्यावरही तो मला धमकीच देत होता.
प्रश्न : हे सगळं चॅटिंग किंवा असे पुरावे तुला कधी मिळाले?
हसिन जहां : माझं लग्न झालं त्यावेळीच मला लगेचच या गोष्टी समजल्या. मी त्याचा मोबाइल हातात घेतला तर तो खेचून घ्यायचा आणि त्यातील गोष्टी डिलीट करायचा. तो कधीच त्याचा फोन माझ्या हातात द्यायचा नाही. नेहमी चालाखी करायचा. तेव्हा जेव्हा घरी यायचा तेव्हा-तेव्हा मी त्याचा फोन चेक करायची. त्यावेळी मला काहीना काही मिळायचंच. तो सुरुवातीला एका मुलीशी तब्बल पाच वर्ष रिलेशनमध्ये होता. तिच्यासोबत रिलेशनमध्ये असतानाही त्याने माझ्याशी अफेअर सुरु केलं. त्याने माझ्याशी साखरपुडा केला. त्यानंतर त्याने मला सांगितलं की, तो एका मुलीशी पाच वर्ष रिलेशनमध्ये होता. त्यानंतरही मी त्याच्याशी लग्न केलं. पण हा एवढा घाणेरडा असेल याचा मला अंदाजही नव्हता.
प्रश्न :तू शेवटचं पॅचअॅप करण्याचा प्रयत्न करणार की? तू त्याच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करणार?
हसिन जहां : नाही... नाही... मी आता कायदेशीर मार्गानेच जाणार आहे. जे काही व्हायचं आहे ते आता कायदेशीर मार्गानेच होईल. आतापर्यंत जे झालं ते पुरसे आहे. मी बराच मार खाल्ला, मानसिक त्रास सहन केला. पण यापुढे नाही.
VIDEO :
संबंधित बातम्या :
पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीचं स्पष्टीकरण
मोहम्मद शमी त्यातला नाही, प्रशिक्षकांची प्रतिक्रिया
मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया
अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement