एक्स्प्लोर
इस्लाममध्ये वाढदिवसाची प्रथा नाही, मुलीच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर शमी ट्रोल
मुलीचा वाढदिवसाचे फोटो शमीने शेअर केले होते, ज्यावर इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नसल्याचं सांगत शमीला ट्रोल केलं.
मुंबई : टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. मुलीचा वाढदिवसाचे फोटो शमीने शेअर केले होते, ज्यावर इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नसल्याचं सांगत शमीला ट्रोल केलं.
अलीकडेच शमीने आपली मुलगी आयराचा दुसरा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. या वाढदिवसाचे फोटो शमीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केले आहेत. मात्र इरफान पठाणप्रमाणेच या पोस्टवर लोकांनी शमीवर टीका केलीय.
कित्येकांनी शमीला, आपल्या पत्नीचा हिजाब शिवाय फोटो काढल्यावरुन सुनावलं असून काहींनी इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नसल्याचं सांगत लहानग्या आयराच्या सेलिब्रेशनवरही विरजण टाकलं.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच शमीला पत्नीसोबतचे फोटो शेअर केल्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. शमीने याला चोख प्रत्युत्तरही दिलं होतं. मात्र यावेळी आता चक्क मुलीचा वाढदिवस का साजरा केला असं म्हणतच शमीला ट्रोल करण्यात आलं.
संबंधित बातम्या
पत्नीसोबतच्या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट, शमीचं सडेतोड उत्तर
पत्नीसोबतचा फोटो शेअर करुन शमीच्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement