एक्स्प्लोर
Advertisement
मिताली राजचं वन डेचं 'द्विशतक'
मितालीने वन डे सामन्यांच्या कारकिर्दिती आजवर सात शतकांसह 51.33 च्या सरासरीने सर्वाधिक 6622 धावा ठोकल्या आहेत. तर मितालीने 10 कसोटी आणि 85 टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या महिला संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
हॅमिल्टन : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं न्यूझीलंडविरुद्धच्या हॅमिल्टन वन डेत कारकीर्दीतल्या सामन्यांचं द्विशतक साजरं केलं. दोनशे वन डे खेळणारी मिताली ही जगातली पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे.
मात्र कारकीर्दीतल्या 200 व्या वन डेत मिताली नऊ धावांवर बाद झाली. या सामन्यात भारतीय महिलांना पराभवही स्वीकारावा लागला. मितालीनं 1999 साली भारतीय संघात पदार्पण केलं होतं. भारतानं आजवर खेळलेल्या 263 वन डेपैकी 200 वन डे सामन्यातत मितालीनं प्रतिनिधित्व केलं आहे.
मितालीने वन डे सामन्यांच्या कारकिर्दित आजवर सात शतकांसह 51.33 च्या सरासरीने सर्वाधिक 6622 धावा ठोकल्या आहेत. तर मितालीने 10 कसोटी आणि 85 टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या महिला संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. सर्वाधिक वनडे सामने खेळणाऱ्या महिला खेळाडू मिताली राज (भारत) - 200 सामने चार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड) - 191 सामने झूलन गोस्वामी (भारत) - 174 सामने एलेक्स ब्लॅकवेल (ऑस्ट्रेलिया) - 144 सामने जेनी गन (इंग्लंड) - 143 सामनेCongratulations on No.200 Skipper - @M_Raj03 #TeamIndia ???????? pic.twitter.com/oxCWRp4qGO
— BCCI Women (@BCCIWomen) February 1, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement