एक्स्प्लोर
मायकल क्लार्क आणि पीटरसन आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आयपीएलच्या दहाव्या मोसमात नव्या भूमिकेत दिसणार आहे. क्लार्क सुनिल गावसकर, केविन पीटरसन यांच्या पॅनलसोबत समालोचन करताना दिसणार आहे.
47 दिवस चालणाऱ्या आयपीएलच्या दहाव्या मोसमात दहा ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. जवळपास 20 समालोचकांकडून आयपीएल 10 ऐकायला मिळणार आहे. क्लार्क नुकत्याच भारतात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी मालिकेतही समालोचन करताना पाहायला मिळाला होता.
एक खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र यावेळी आता समालोचन करण्यासाठी उत्सुक आहे, असं मायकल क्लार्कने सांगितलं.
5 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. ही स्पर्धा 47 दिवस चालणार असून 10 वेगवेगळ्या मैदानावर सामने खेळवण्यात येतील. प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. यापैकी सात सामने संघाच्या होम ग्राऊंडवर होतील. 2011 नंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये आयपीएल सामने होणार आहेत.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीने रात्री 8 वाजता आयपीएल 10 ला सुरुवात होईल.
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे यंदा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा केवळ सलामीच्या सामन्याच्या एकाच स्टेडियममध्ये नाही तर, पाच सामन्यांच्या वेगवेगळ्या स्टेडियम्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.
हैदराबाद-बंगळुरु संघांमधल्या उद्याच्या हैदराबादमधल्या सामन्याच्या दिवशी अॅमी जॅक्सनची अदाकारी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.
पुणे-मुंबई संघांमधल्या सहा एप्रिलच्या सामन्यानिमित्ताने गहुंजे स्टेडियमवर रितेश देशमुखचा परफॉर्मन्स असेल.
सात एप्रिलला गुजरात-कोलकाता सामन्याच्या निमित्ताने टायगर श्रॉफ राजकोटच्या स्टेडियमवर परफॉर्म करेल.
कोलकाता-पंजाब सामन्याच्या निमित्ताने 13 एप्रिलला ईडन गार्डन्सवर श्रद्धा कपूर आणि मोनाली ठाकूर या दोघींचा परफॉर्मन्स असेल.
त्यानंतर 15 एप्रिलला दिल्ली-पंजाब सामन्याच्या निमित्ताने दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर परिणीती चोप्राचा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.
बंगळुरू आणि इंदूरला आठ एप्रिल रोजी, तर मुंबईत नऊ एप्रिल रोजी होत असलेल्या सामन्यांआधीही एखाद्या लोकप्रिय कलाकाराचा परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळणार आहे.
संबंधित बातमी : आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement