एक्स्प्लोर

पाचवी वन डे : इतिहास रचण्यासाठी भारताला इतिहास बदलावा लागणार!

दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गची चौथी वन डे जिंकून सहा सामन्यांच्या मालिकेत भारताची आघाडी 1-3 अशी कमी केली.

पोर्ट एलिझाबेथ : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातली पाचवी वन डे उद्या पोर्ट एलिझाबेथच्या सेंट जॉर्जेस पार्कवर खेळवण्यात येईल. दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गची चौथी वन डे जिंकून सहा सामन्यांच्या मालिकेत भारताची आघाडी 1-3 अशी कमी केली. पावसाचा व्यत्यय आणि डेव्हिड मिलरला दिलेली जीवदानं यामुळे टीम इंडियाला चौथ्या वन डेत हार स्वीकारावी लागली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या वन डे सामन्यांच्या मालिकेत ऐतिहासिक विजय नोंदवण्याची टीम इंडियाची संधी जोहान्सबर्गमध्ये हुकली. भारताला गेल्या 25 वर्षांच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेत वन डे सामन्यांची मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे विराट कोहलीची टीम इंडिया पाचव्या वन डेसाठी नव्या जोमाने पोर्ट एलिझाबेथच्या मैदानात उतरेल. पोर्ट एलिझाबेथचं मैदान आणि भारत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये आतापर्यंत एकही वन डे सामना जिंकलेला नाही. आतापर्यंत इथे खेळलेल्या सर्वच्या सर्व पाचही सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. एवढंच नाही, तर केनियानेही भारतावर या मैदानात मात केली होती. पाचही सामन्यांमध्ये भारताला 200 पेक्षा जास्त धावांचा पल्ला ओलांडता आलेला नाही. आतापर्यंत खेळलेला पाच सामन्यांमध्ये भारताची धावसंख्या 147, 179, 176, 163 आणि 142 अशी आहे. पोर्ट एलिझाबेथची हवा भारताची सर्वात मोठी समस्या पोर्ट एलिझाबेथमधील वेगवान वारं ही भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या असेल. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनाही या खेळपट्टीवर लय सापडण्यास अडचणी येतात. हवामान विभागानेही सामन्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला वेगवान वाऱ्याचा इशारा या सामन्यापूर्वी दिला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून योग्य निर्णय घेण्याचं आव्हान कर्णधार विराट कोहलीसमोर असेल. भारतीय संघात बदल होणार? गेल्या सामन्यातील पराभव पाहता भारतीय संघात बदल होण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या सामन्यापूर्वी दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेल्या केदार जाधवच्या फिटनेसबाबत अजूनही साशंकता आहे. तो फिट झाल्यास श्रेयस अय्यरच्या जागी त्याचं पुनरागमन होईल. मधल्या फळीतील फलंदाज म्हणूनच नव्हे, तर एक गोलंदाज म्हणूनही त्याची भूमिका मोलाची राहिल. वेगवान हवेची वेगवान गोलंदाजांना मदत मिळते, त्यामुळे कर्णधार विराट कोहली अंतिम अकरामध्ये एकाच फिरकीपटूसह उतरु शकतो. म्हणूनच मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची शक्यता वाढली आहे. रोहित शर्मा आणि मधल्या फळीतील फलंदाजीचं आव्हान वन डे मालिकेत सलामीवीर रोहित शर्माला आतापर्यंत एकही मोठी खेळी करता आलेली नाही. त्याने चार सामन्यात केवळ 40 धावा केल्या आहेत. कॅगिसो रबाडाचा चेंडू त्याच्यासमोर आव्हान आहे. रोहित शर्मासोबत मधल्या फळीतील फलंदाजांसमोरही मोठं आव्हान असेल. कारण पहिल्या सामन्यात 79 धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेला पुन्हा मोठी खेळी करता आलेली नाही. शिवाय हार्दिक पंड्याही फॉर्मात नाही. वन डे मालिकेत विराट कोहली (393) आणि शिखर धवन (271) यांनी मिळून उर्वरित फलंदाजांच्या (239) तुलनेत तीनपट धावा केल्या आहेत. त्यामुळे फलंदाजीमध्ये सुधारणा करणं भारतीय थिंक टँकसाठी मोठं आव्हान असेल. दुसरीकडे आणखी एका विजयासाठी दक्षिण आफ्रिका उत्सुक असेल. गुलाबी जर्सीत मिळालेला विजय आणि एबी डिव्हिलियर्सचं कमबॅक यामुळे दक्षिण आफ्रिकेचं मनोबल वाढलेलं आहे. भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी 4.30 वाजता हा सामना सुरु होईल. संघ भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर. दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), हाशिम आमला, जेपी ड्युमिनी, हेनरिक क्लासन (विकेटकीपर), एबी डिविलियर्स, इम्रान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मोर्केल, ख्रिस मॉरिस, लुंगीसानी एनगिडी, एंडिले फेलुकवायो, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, खायेलिहले जोंडो, फरहान बेहारडियन.

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
IND vs WI 4th T20I Live : श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
Team India Squad For New Zealand ODI : 137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
Hardik Pandya IPL News : MI कडून गच्छंती होणार... त्यात हार्दिक पांड्या मुंबईत परतला; IPL आधी मोठ्या चर्चांना उधाण, पाहा VIDEO
MI कडून गच्छंती होणार... त्यात हार्दिक पांड्या मुंबईत परतला; IPL आधी मोठ्या चर्चांना उधाण, पाहा VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Embed widget