एक्स्प्लोर
दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचं सचिन तेंडुलकरचं आवाहन
क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच रस्त्यावरुन दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी सचिननं ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. ‘
मुंबई : फास्टर असो किंवा स्पीनर.. क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना नेहमी हेल्मेट परिधान करुनच मैदानावर उतरला.
क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच रस्त्यावरुन दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी सचिननं ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हेल्मेट डाले 2.0’ असं कॅप्शन असलेल्या व्हिडीओमध्ये सचिन दुचाकीस्वारांना हेल्मेट घालण्याचं आवाहन करत आहे.
फक्त रायडरनंच नव्हे तर डबल सीट बसणाऱ्यांनी देखील हेल्मेट घातलं पाहिजे असा सचिन तेंडुलकरचा आग्रह आहे. तेव्हा हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांनी किमान सचिनचं ऐकावं आणि हेल्मेट घालूनच गाडी चालवावी.Rider or pillion, both lives matter equally. Please, please make wearing helmets a habit. Just my opillion :) #HelmetDaalo2.0 #RoadSafety pic.twitter.com/0Lamnsj3Fq
— sachin tendulkar (@sachin_rt) November 3, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement