एक्स्प्लोर

Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम

देशात सोन्याचे दर वाढलेले असताना या ‘विरोष’ जोडीने साकारलेला सुवर्णमय लूक चाहत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून गेला.

Rashmika vijay wedding Gold jwellery: उदयपूरच्या राजेशाही वातावरणात गुरुवारी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना विवाहबंधनात अडकले, आणि त्यांच्या भव्य लग्नसोहळ्याइतकाच त्यांच्या ठसठशीत दागिन्यांचा विषय चर्चेचा ठरला. देशात सोन्याचे दर वाढलेले असताना या ‘विरोष’ जोडीने साकारलेला सुवर्णमय लूक चाहत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून गेला.
Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम

विजय देवरकोंडाने आपल्या खास दिवशी पारंपरिकतेला राजेशाही स्पर्श देत भरगच्च सोन्याचे दागिने परिधान केले.मोठे कानातील स्टड्स, मनगटावरील जाड कफ, दोन देखणे हार, पायातील कडे आणि करंगळीतील अंगठी या सर्वांनी त्याचा लूक वेगळाच उठावदार बनवला.

Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम

साधेपणातही दिमाख कसा असावा, याचं उत्कृष्ट उदाहरण विजयने साकारलं. तर नववधू रश्मिका मंदाना अक्षरशः सुवर्णालंकारांनी नटलेली दिसली. तिने तब्बल 11 दागिन्यांनी आपला वधू-श्रृंगार पूर्ण केला होता. चोकर, झुमके, जडा बिल्ला, चंपासराळू, हातफूल, माथापट्टी, नथ, बांगड्या, बाजूबंद, कंबरपट्टा आणि नाजूक पैंजण...प्रत्येक अलंकार तिच्या रूपाला अधिकच राजेशाही झळाळी देत होता.

Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम

या दिमाखदार आणि पारंपरिक अंदाजामुळे विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. चाहत्यांकडून त्यांच्या या रॉयल वेडिंग लूकवर कौतुकाचा वर्षाव होत असून ‘विरोष’ जोडी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम

आजकाल अनेक जोडपी लग्नासाठी कमीत कमी दागिन्यांचा ट्रेंड स्वीकारताना दिसतात. मात्र विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी पारंपरिक वारसा जपणाऱ्या पौराणिक डिझाइनची निवड करत वेगळाच राजेशाही ठसा उमटवला.

Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम

 SHREE Jewellers चे अभिषेक अग्रवाल आणि कौशिक कुमार यांनी सांगितले की या संपूर्ण दागिन्यांची निर्मिती पूर्ण होण्यासाठी तब्बल दहा महिने लागले.विजयच्या दागिन्यांमध्ये पौराणिक राजाच्या अधिकाराची झलक जाणवत होती. हत्ती आणि वाघ यांच्या प्रतिकांसह फुलांच्या नक्षीने सजलेले अलंकार त्याच्या व्यक्तिमत्त्वाला राजेशाही दिमाख देत होते.

Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम

पुरुषांचे दागिने सहसा हार आणि अंगठीपुरते मर्यादित असतात; पण विजयचा संपूर्ण लूक एका सार्वभौम राजाच्या उपस्थितीची अनुभूती देणारा ठरला.तर रश्मिकाचा वधू- शृंगारत एखाद्या देवीची आभा स्पष्टपणे जाणवत होती. तिच्या प्रत्येक दागिन्यात नाजूक आणि वैभवतेचा सुरेख मिलाफ दिसत होता. 

Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम

हे सर्व अलंकार अँटिक लूकमध्ये तयार करण्यात आले असून ते पिढ्यान्पिढ्या टिकणारे ‘लेगसी पीसेस’ म्हणून केल्याचे डिझायनर्सनी स्पष्ट केले. डिझाइनची संकल्पना, अनेक फेऱ्यांच्या चर्चा, खास कस्टमायझेशन, निर्मिती, ट्रायल्स आणि अंतिम लूक साकारण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास दहा महिन्यांचा होता, असे त्यांनी सांगितले.

Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम

विजय आणि रश्मिकाचे समन्वय साधणारे वेडिंग आउटफिट्स प्रसिद्ध डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाइन केले होते. नवदांपत्याने अद्याप प्री-वेडिंग सोहळ्यांचे फोटो शेअर केले नसल्याने चाहत्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
Bigg Boss Marathi 6: एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
एलिमिनेट होताच रुचिता भेटली बिग बॉसच्या खास स्पर्धकाला, व्हिडिओ टाकत म्हणाली...
‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..
‘धुरंधर’चा जलवा थेट फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत! लेकाच्या सांगण्यावरून पाहिला चित्रपट, भारतात येताच म्हणाले..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीची चाहत्यांना गुड न्यूज, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम अभिनेत्रीची चाहत्यांना गुड न्यूज, लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
Embed widget