एक्स्प्लोर
महाराष्ट्र केसरी : उपांत्य फेरीत अभिजीत विरुद्ध निलेश
मॅट विभागात अक्षय शिंदे, कौतुक डाफळे, अभिजीत कटके, निलेश लोखंडे या पैलवानांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत उपांत्य फेरी गाठली.
पुणे : पुण्याच्या भूगावमध्ये सुरु असलेल्या महाराष्ट्रातील प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे. उपांत्य फेरीत गतविजेता अभिजीत कटकेचा सामना निलेश लोखंडेशी होणार आहे.
शनिवारी सकाळच्या सत्रात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींमध्ये मॅट आणि माती विभागातल्या आठ पैलवानांनी उपांत्य फेरीत धडक मारली.
मॅट विभागात अक्षय शिंदे, कौतुक डाफळे, अभिजीत कटके, निलेश लोखंडे या पैलवानांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत उपांत्य फेरी गाठली. मॅटवरील उपांत्यपूर्व लढतीत लातूरच्या सागर बिराजदारचा पराभव झाला. कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सागरवर 8-0 ने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
माती विभागात तानाजी झुंजुरके, बाला रफिक, किरण भगत, आणि सूरज निकमनं उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. संध्याकाळच्या सत्रात या दोन्ही विभागातील उपांत्य फेरीचे सामने पार पडतील.
माती विभागात तानाजी झुंजुरके विरुद्ध पोपट घोडके अशा झालेल्या लढतीत काका पवारांचा चेला पोपट घोडकेचा पराभव झाला.
विजेता तानाजी हा पुण्यातील मुळशी तालुक्यातला आहे.
संबंधित बातम्या
महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2017: चंद्रहार, विक्रांत हरले!
गणेशने कुस्ती जिंकलीच, चंद्रहारच्या पाया पडून मनंही जिंकली!
पहिल्याच फेरीत फायनलचा थरार, महाराष्ट्र केसरीचा चुरशीचा ड्रॉ
कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement