एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टीम इंडियाचा कांगारुंवर दणदणीत विजय, मालिकेत 1-1नं बरोबरी
बंगळुरु:विराट कोहलीच्या टीम इंडियानं बंगळुरू कसोटीत खरोखरच कमाल केली. या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं 87 धावांची आघाडी घेतलेली असूनही, टीम इंडियानं या कसोटीला कलाटणी दिली आणि 75 धावांनी विजय खेचून आणला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 112 धावांवर बाद झाला.
या विजयासह भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयात टर्निंग पॉइंट ठरली ती चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या डावात पाचव्या विकेटसाठी केलेली 118 धावांची भागीदारी. दरम्यान, पुजारा आणि रहाणेच्या भागिदारीनं मनोबल उंचावलेल्या भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 112धावांत गुंडाळण्याचा पराक्रम गाजवला. दुसऱ्या डावात अश्विननं 6 बळी घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
या भागिदारीमुळंच भारताला ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 188 धावांचं लक्ष्य देता आलं होतं. पण पुजारा आणि रहाणेच्या भागिदारीनं मोबल उंचावलेल्या भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव धावांत गुंडाळण्याचा पराक्रम गाजवला.
-------
बंगळुरुत कसोटीत टीम इंडियाचा दुसरा डाव 274 धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी आता 188 धावांचं आव्हान आहे. तिसऱ्या दिवशी झुंजार फलंदाजी करणाऱ्या रहाणे आणि पुजाराला आज मात्र फारशी चमक दाखवता आली नाही.
LIVE: टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर, ऑस्ट्रेलियाचे 9 गडी तंबूत
LIVE: ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, टीम इंडियाला विजयासाठी 2 विकेटची गरज
LIVE: ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज बाद, टीम इंडियाला विजयासाठी 3 विकेटची गरज
LIVE: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, कर्णधार स्टिव्ह स्मिथ 28 धावांवर बाद
LIVE- ऑस्ट्रेलियाचेही तीन गडी बाद, टीम इंडियाचीही टिच्चून गोलंदाजी
चौथ्या दिवशी पहिल्याच सत्रात टीम इंडियानं एकापाठोपाठ एक तीन गडी गमावले. त्याआधी रहाणेनं मात्र, आपलं अर्धशतक झळकावलं. पण अर्धशतक झळकावून रहाणे बाद झाला. त्यानंतर आलेला करुण नायरही शून्यावर बाद झाला. तर त्याच्याच पुढच्या षटकात पुजारा 92 धावांवर तंबूत परतला. त्याचपाठोपाठ अश्विनही बाद झाला.
दरम्यान, फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियासमोर असणारं 188 धावांचं आव्हानं वाटतं तितकं सोपं नाही. भारताची सगळी मदार आता गोलंदाजांवर असणार आहेत. चांगली कामगिरी करुन भारतीय गोलंदाज या सीरिजमध्ये बरोबरी करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
LIVE: टीम इंडियाचा नववा गडी बाद, उमेश यादव माघारी
काल अजिंक्य रहाणे आणि पुजारानं 93 धावांची भागीदारी रचली होती. पण आजच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत टीम इंडियाचे चार गडी बाद केले.
दरम्यान,टीम इंडियानं तिसऱ्या दिवसअखेर चार बाद 213 धावांची मजल मारली होती. तिसऱ्या दिवशी सकाळी, रवींद्र जाडेजानं 63 धावांत सहा विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 276 धावांत रोखलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement