एक्स्प्लोर
राजकोट कसोटी: तिसऱ्या दिवसावर पुजारा-विजयचं वर्चस्व
राजकोट: सलामीचा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारानं झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारतानं राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवलं. पण अखेरच्या सत्रात दोन्ही शतकवीरांसह नाईट वॉचमन अमित मिश्राही बाद झाला. त्यामुळं तिसऱ्या दिवसअखेर भारताचा स्कोरबोर्ड चार बाद 319 अशी स्थिती दाखवत होता.
तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी विराट कोहली 26 धावांवर खेळत होता. राजकोट कसोटीत आज तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारानं कसोटी कारकीर्दीतलं आपलं नववं शतक साजरं केलं. पुजारानं 206 चेंडूंत सतरा चौकारांच्या मदतीनं 124 धावांची खेळी उभारली.
मुरली विजयनं 301 चेंडूंतली 126 धावांची खेळी नऊ चौकार आणि चार षटकारांनी सजवली. मुरली विजयचं हे सातवं कसोटी शतक ठरलं.
पुजारा आणि विजयनं दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची भागीदारी रचली. त्यामुळंच भारताला चार बाद 319 धावांची मजल मारता आली. भारत पहिल्या डावात अजूनही 218 धावांनी पिछाडीवर असून, फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडियाला 18 धावांची आवश्यकता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement