(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Football : प्रतीक्षा संपली! कोल्हापूर फुटबाॅल हंगाम 4 डिसेंबरपासून सुरु होणार; शाहू स्टेडियम गर्दी अनुभवण्यास सज्ज
Kolhapur Football : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोल्हापूर फुटबाॅलमय झाले आहे.
Kolhapur Football : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम 4 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोल्हापूर फुटबाॅलमय झाले आहे. अनेक तालीम, मंडळे आणि गल्लीबोळांमध्ये फुटबाॅलपटूंची कटआऊट आणि बॅनर्स लावण्यासाठी ईर्ष्या लागली आहे. त्यामुळे आता आपल्या स्थानिक खेळाडूंना आणि संघाना पोत्साहान देण्यासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत.
चार डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या हंगामासाठी (kolhapur Football) संघांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पुन्हा एकदा गर्दी अन् जोश अनुभवण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शाहू स्टेडियमवरही जय्यत तयारी सुरु आहे. चालू हंगामासाठी 16 संघांची तयारी सुरु आहे. सीनियर सुपर 8 व सुपर 8 अशा दोन गटांतर्गत दररोज 2 असे एकूण 56 सामने होतील. चालू हंगामासाठी हंगामासाठी 348 खेळाडू करारबद्ध झाले असून यामध्ये 24 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
सहा महिन्यांपर्यंत चालणाऱ्या या मोसमात अनेक परदेशी खेळाडू कोल्हापुरात घराघरात पोहोचले आहेत. गेल्या दोन वर्षात निर्बंधांमुळे कोल्हापूर क्लबने एकाही परदेशी खेळाडूला संघात घेतले नव्हते. जिल्ह्यातील सर्वोच्च क्रीडा संस्था असलेली कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन कोल्हापूरच्या बाहेरील जास्तीत जास्त तीन खेळाडूंना प्रवेश देण्यास परवानगी देते. यापैकी दोन परदेशी असू शकतात.
साखळी सामने कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (KSA) मार्फत सुरुवातीला खेळवले जातील आणि नंतर पात्र संघ बाद फेरीत लढतील. प्रथम सामने KSA द्वारे आयोजित केले जातात आणि नंतर अनेक शीर्षक प्रायोजकांद्वारे (title sponsors) स्पर्धा आयोजित केल्या जातात.
दरम्यान, फुटबाॅल पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये फुटबाॅल चाहत्यांनी विशेष करून रोनाल्डो, मेस्सी, नेमारचे कटआऊट बॅनर लावले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला फुटबाॅलची पंढरी समजली जाते. मंगळवार पेठेतील गुलाब गल्लीत वर्ल्डकपमध्ये सहभागी असणाऱ्या देशांच्या पताका लावण्यात आल्या आहेत. सायबर चौकात लावलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कटआऊटने चांगलेच लक्ष वेधले आहे. कटआऊटला कट्टर ख्रिस्तियानो साहेब समर्थक कोल्हापूर असे नाव दिल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. कोल्हापूरमध्ये रोनाल्डो, मेस्सी आणि नेमारचे हजारो फॅन आहेत. लिओनेल मेस्सीचे कटआऊटही चर्चेचा विषय आहे. रोनाल्डोच्या कटआऊटसोबत सेल्फी घेण्यासाठी अनेक फुटबाॅल शौकिन गर्दी करत आहेत. नेमारही कोल्हापूरच्या भिंतीवर झळकला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या