Saudi Arabia stun Argentina : सौदी अरेबिया अर्जेंटिनाविरुद्ध जोरात अन् कोल्हापुरात मेस्सीचे चाहते 'कोमात'!
Saudi Arabia stun Argentina : सौदीने संभाव्य विजेते म्हणून पाहल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या अर्जेटिनाविरोधात दुसऱ्या सत्रात उत्कृष्ट बचाव व अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत 2-1 ने असा विजय मिळवला.
Saudi Arabia stun Argentina : कोणाच्या खिजगणतीतही नसलेल्या सौदी अरेबियाने संभाव्य विजेते म्हणून पाहल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या अर्जेटिनाविरोधात दुसऱ्या सत्रात उत्कृष्ट बचाव व अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत 2-1 ने असा विजय मिळवला. सौदीचा गोलकीपर सौदीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मात्र, मेस्सीच्या अर्जेंटिनाला पहिल्याच सामन्यात पराभवाची धुळ चाखावी लागल्याने जगभरातील चाहते कोमात गेले आहेत दुसरीकडे बलाढ्य अर्जेटिनाला पाणी पाजल्याने सौदी अरेबियात मात्र जल्लोषाला उधाण आले.
सौदीच्या विजयानंतर उपस्थित चाहत्यांनी मैदान डोक्यावर घेत जल्लोष केला. दोहाच्या रस्त्यावरूनही जल्लोष दिसून आला. मात्र, या पराभवानंतर अर्जेंटिनाला जितका मोठा धक्का बसला तितकाच फुटबाॅल पंढरी असणाऱ्या कोल्हापुरातही बसला. संपूर्ण कोल्हापूर शहर फुटबॉलमय झाले असून गल्ली, चौकात मेस्सी, रोनाल्डो आणि नेमारच्या कटआऊट आणि बॅनर लागले आहेत. शेवटची संधी म्हणूनही बॅनर लागले आहेत. त्यामुळे पहिल्याच पहिल्या लाडक्या खेळाडूला पराभूत होताना पाहिल्यानंतर कोल्हापूर फुटबाॅलप्रेमींमध्ये निराशा पसरली. पहिल्यांच 10 मिनिटात मेस्सीने आनंदाला संधी दिली होती. मात्र, त्यानंतर पूर्ण सामन्यात निराशा झाली.
पूर्वार्धात 10 व्या मिनिटाला मेस्सीने पेनल्टीवर गोल केला. पूर्वार्धात अर्जेंटिनाच्या मार्टिनेझने केलेले दोन गोल ऑफसाईड ठरल्याने अर्जेंटिनाची संधी हुकली. मध्यंतरास अर्जेंटिना 1-0 असा आघाडीवर होता. उत्तरार्धातील पहिल्या दहा मिनिटात सौदी अरेबियाने दोन गोल करत अर्जेंटिनाला मोठा धक्का दिला. 48 मिनिटाला सौदीच्या अल शहरीने मैदानी गोल नोंदवत संघाला बरोबरीत आणले. त्यानंतर जर्सी क्रमांक दहा अल दावसारी ने 53 मिनिटाला गोल करत सौदी अरेबियाला आघाडी मिळवून दिली.
सौदीच्या गोल रक्षकाने अप्रतिम कामगिरी केली. बरोबरी साधण्यासाठी अर्जेटिनाने चढायचा वेग वाढवला पण सौदी अरेबियाने भक्कम बचाव करताना आक्रमण परतावून लावले. मेस्सी, डी मारिओ, मार्टिनेज यांनी गोल करण्याचे अप्रतिम प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. पूर्ण वेळेत एक गोलची आघाडी कायम टिकवत जिंकत सौदी अरेबियाने विश्वचषक स्पर्धेत इतिहास घडवला.
आखाती देशातील संघाचा पहिला विजय
दरम्यान, सौदी अरेबियाने यापूर्वीच्या चार सामन्यांमध्ये अर्जेंटिनाला कधीही हरवले नव्हते. संभाव्य विजेत्या विजयामुळे स्टेडियममध्ये आणि दोहाभोवती सौदी चाहत्यांनी जल्लोष केला. आतापर्यंत आखाती देशातील संघाचा हा पहिला विजय आहे. जो या प्रदेशाने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. यजमान कतारला इक्वेडोरकडून पराभव पत्करावा लागला, तर सोमवारी इराणचा इंग्लंडकडून पराभव झाला.
इतर महत्वाच्या बातम्या