एक्स्प्लोर
Advertisement
दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सुपरमॅन, संजू सॅमसनचं अप्रतिम क्षेत्ररक्षण
नवी दिल्ली : पुणे सुपरजाएंटविरुद्ध 102 धावांची धडाकेबाज खेळी करुन यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला शतकवीर ठरणारा दिल्लीचा फलंदाज संजू सॅमसन एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही आहे. याचाच प्रत्यय फिरोजशाह कोटला मैदानावर खेळल्या गेलेल्या कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात आला.
दिल्ली डेअरडेव्हिल्सला कोलकात्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र संजू सॅमसनच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने सर्वांचं मन जिंकलं.
दिल्लीने विजयासीठी दिलेल्या 169 धावांच्या पाठलाग करताना कोलकात्याला 11 चेंडूत 15 धावांची गरज होती. 19 व्या षटकात ख्रिस मॉरिसने टाकलेला चेंडू मनीष पांडेने जोराने मारला. मनीष पांडेने मारलेला फटकार एवढा जोरात होता की, तो षटकार असेल, असं सर्वांनी समजलं.
मात्र क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या संजू सॅमसनने मोठ्या चतुराईने तो चेंडू अडवला. झेल घेण्यात संजूला यश आलं नसलं तरी त्याने क्षेत्ररक्षणातून सर्वांचं मन जिंकलं. या क्षेत्ररक्षणानंतर त्याचं दिल्लीचा कर्णधार झहीर खानसह सर्वांनी कौतुक केलं.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement