एक्स्प्लोर
लोकेश राहुलचं वादळ, पंजाबचा सहा विकेट्सने विजय
यंदाच्या मोसमातला पंजाबचा हा सहावा विजय ठरला. राजस्थानने पंजाबसमोर 153 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं.
इंदूर : लोकेश राहुलच्या नाबाद 84 धावांच्या खेळीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवला. यंदाच्या मोसमातला पंजाबचा हा सहावा विजय ठरला.
राजस्थानने पंजाबसमोर 153 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. लोकेश राहुलच्या नाबाद खेळीमुळे पंजाबने हे आव्हान आठ चेंडू आणि सहा विकेट राखून पार केलं.
राहुलने सलामीला येत 54 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 84 धावांची खेळी साकारली. करुण नायरने 23 चेंडूत 31 धावांची खेळी करत राहुलला छान साथ दिली. शेवटी मार्कस स्टॉईनिसच्या (23 धावा) साथीने राहुलने पंजाबला विजय मिळवून दिला.
त्याआधी राजस्थानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर जॉस बटलरने 39 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी उभारली. मात्र त्याला खंबीरपणे कुणीही साथ दिली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणेही केवळ पाच धावा करुन माघारी परतला.
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी केवळ तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे राजस्थानला आपलं मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल, तर यापुढच्या पाचपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement