एक्स्प्लोर

खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्र 27 पदकांसह सहाव्या स्थानावर

नेमबाजीत स्वरुप उन्हाळकरला अपयश, पॉवरलिफ्टिंगमध्ये दिनेश बागडेला कांस्यपदक, टेबल टेनिसमध्ये आगेकूच

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि साई यांच्या संयुक्त उपक्रमाने सुरु असलेल्या पहिल्या पॅरा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी एका ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राची स्पर्धेत आता ९ सुवर्ण, ६ रौप्य, १२ ब्रॉंझ अशी २७ पदके झाली असून, ते सहाव्या स्थानावर आहेत. हरियाना  ३५ सुवर्ण, ३७ रौप्य, १९ ब्रॉंझपदकांसह ९१ पदके मिळवून अग्रस्थान टिकवून आहे. उत्तर प्रदेश (२४, १८, ९) ५१, तमिळनाडू (१७, ६, १३)३६, गुजरात (११, १६, ११) ३८ आणि राजस्थान (९, १९, ११) ३९ पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थनावर आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या पॅरा पॉवरलिफ्टर दिनेश बागडेने शुक्रवारी महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या एलिट १०७ किलो वजन गटात १४८ किलो वजन उचलून ही कामगिरी केली. त्याचे रौप्यपदक केवळ दोन किलोंनी हुकले.  राजस्थानच्या मिलन कुमारने १५० किलो वजन उचलताना रौप्यपदकाचा मान मिळविले. महाराष्ट्राचे हे या क्रीडा प्रकारातील चौथे पदक ठरले. 

कामगिरी समाधानकारक - सारिका सरनाईक
पहिल्याच स्पर्धेत महाराष्ट्राने चार पदके मिळवून आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. खेळाडूंच्या कठोर मेहनतीमुळेच हे यश मिळाले असून, यामुळे भविष्यात अनेक युवकांना या कामगिरीने प्रेरणा मिळेल, अशा शब्दात प्रशिक्षक सारिका सरनाईक यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. 

टेबल टेनिसमध्ये आगेकूच
महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी चमकदार कामगिरी करताना आपली आगेकूच कायम राखली. पुरुष गटात दत्तप्रसाद चौगुले, विश्व तांबे यांनी विजय मिळविले. महिला गटात क्लास ६ प्रकारातून वैष्णवी सुतार आणि उज्वला चव्हाण यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवून आपली गुणवत्ता दाखवून दिली. या कामगिरीने महाराष्ट्राची या खेळातील पदकाची खात्री निर्माण झाली आहे. 

टेबल टेनिस निकाल -
क्लास ९ - दत्तप्रसाद चौगुले वि. वि,. ब्रिजेंद्र सिंग ११-३, ११-९, ११-२
क्लास १० - विश्व तांबे वि.वि. जगन्नाथ मुखर्जी  ११-५, १६-१४, ८-११, ११-५, ओम लोटलीकर पराभूत वि. हितेश दलवानी ७-११, ८-११, ७-११
क्लास ८ - स्वप्नील शेळके पराभूत तुषार नागर ९-११, ७-११, ११-९, ८-११
क्लास ५ - विवेक मोरे पराभूत वि. आर. अलागर ४-११, ५-११, ४-११, रिषीत नथवानी वि.वि. अभिषेककुार सिंग ११-५, ११-४, ११-७

महिला -
क्लास ६ - वैष्णवी सुतार पराभूत वि. भाविका कुकाडिया ७-११, ९-११, ६-११, वैष्णवी सुतार वि.वि. नयना कांबळे ११-१, ११-१, ११-१, 
क्लास ९,१० - पृथ्वी बारे वि.वि. मेहक कासार ९-११, १७-१५६, ८-११, ११-५, ११-९, 
क्लास ६ - उज्वला चव्हाण पराभूत वि. पूनम ३-११, ४-११, ७-११, उज्वला चव्हाण वि.वि. उर्मिला पाल ११-७ ११-८, ४-११, १४-१२

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget