एक्स्प्लोर
जसप्रीत बुमराह 'या' सामन्याद्वारे टिम इंडियामध्ये कमबॅक करणार
भारत आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये रविवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता आहे.
मुंबई : टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह फिटनेसच्या कारणांमुळे संघापासून लांब आहे. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत टिम इंडियासह भारतीय क्रिकेट चाहत्यांना बुमराहची उणीव भासली. परंतु लवकरच बुमराह टिम इंडियामध्ये पुनरागमन करणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये रविवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात बुमराह खेळण्याची शक्यता आहे. बुमराहच्या कमबॅकची बातमी जाहीर झाल्यापासून त्याच्या चाहत्यांसह भारतीय क्रीडारसिकांना आनंद झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बुमराहच्या कमरेजवळच्या हाडाला फ्रॅक्चर झाले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून त्याने माघार घेतली. हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो लंडनला गेला होता. बुमराहला शस्त्रक्रिया करावी लागेल, अशा अफवा पसरल्या होत्या. परंतु त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला होता.
उपचार घेऊन भारतात परतलेला बुमराह फिटनेससाठी कसून सराव करत आहे. त्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करेल, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.
Ready to jump into this week like. #MondayMotivation pic.twitter.com/zpxsaXIKwm
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) December 2, 2019
No place for excuses. #HustleOn 💪🏼 pic.twitter.com/KKJJFHnsHi
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) November 21, 2019
View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement