एक्स्प्लोर
रक्षाबंधन सेल्फीनंतर इरफान पठाण सोशल मीडियावर ट्रोल
कथित धर्मरक्षकांकडून पठाणला बरेचदा संस्कृती रक्षणाचे उपदेशपर डोस पाजले जातात. त्याचप्रमाणे रक्षाबंधन साजरा करणाऱ्या पठाणला हिंदू सण साजरे न करण्याचा सल्ला देण्यात आला.
मुंबई : रक्षाबंधन साजरा केल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर क्रिकेटपटू इरफान पठाणला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. गेल्या काही दिवसात पठाण दुसऱ्यांदा ट्रोल होत आहे.
इरफान पठाणसाठी ट्रोलिंग हा काही नवीन विषय नाही. कथित धर्मरक्षकांकडून पठाणला बरेचदा संस्कृती रक्षणाचे उपदेशपर डोस पाजले जातात. त्याचप्रमाणे रक्षाबंधन साजरा करणाऱ्या पठाणला हिंदू सण साजरे न करण्याचा सल्ला देण्यात आला. मुस्लिम पंरपरेनुसार रक्षाबंधन मान्य नसल्याचं काही जणांनी फेसबुकवर म्हटलं.
इरफानने काही दिवसांपूर्वी पत्नी सफा बेगसोबत फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सफा आपला चेहरा हातानं झाकत असल्याचं दिसत होतं. यावरुनच अनेकांनी ट्रोल करणं सुरु केलं. सफाचा चेहरा दिसत असल्यानं इरफानवर अनेकांनी टीका केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement