एक्स्प्लोर
किशोरवयीन राशीद खानने आयपीएलमध्ये इतिहास रचला!

हैदराबाद: दहशतवाद आणि युद्धसदृश्य स्थितीने जेरीस आलेल्या अफगाणिस्तानच्या किशोरवयीन क्रिकेटपटूने इतिहास रचला आहे. राशीद खान हा आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अफगाणिस्तानी खेळाडू ठरला आहे.
राशीद खान हा अवघ्या 18 वर्षांचा आहे. तो सनरायझर्स हैदराबादकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधात मैदानात उतरला.
लेग स्पिनर असलेल्या राशीदने कालच्या सामन्यात 4 षटकात 36 धावा देत 2 विकेट घेतल्या.
राशीदला सनरायझर्स हैदराबादने 4 कोटीची बोली लावून आपल्या संघात घेतलं.
राशीदने नुकतंच आयरलँडविरुद्धच्या मालिकेत उत्तम कामगिरी केली होती. राशीदने आंतरराष्ट्रीय टी ट्वेण्टी सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. तर सामन्यात 5 वन डे सामन्यात 16 विकेट त्याच्या नावावर आहेत.
त्याने एक अर्धशतकही ठोकलं आहे. आतापर्यंत 33 टी 20 सामन्यात राशीदने 56 विकेट्स घेतल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबादची विजयी सुरुवात, बंगळुरुवर 35 धावांनी मात
सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या दहाव्या मोसमाची सुरुवात विजयाने केली. हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 35 धावांनी विजय मिळवला.
सनरायझर्सने बंगळुरुसमोर विजयासाठी 208 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष बंगळुरुला पार करता आलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
