छोरियां छोरो से कम है के! व्हेलोसिटीविरुद्ध सामन्यात हरमनप्रीत कौरचा अफलातून झेल, पाहा व्हिडिओ
WT20 Challenge 2022: महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील दुसरा सामना सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी(Velocity vs Supernovas) यांच्यात मंगळवारी खेळला गेला.
WT20 Challenge 2022: महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील दुसरा सामना सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी(Velocity vs Supernovas) यांच्यात मंगळवारी खेळला गेला. या सामन्यात व्हेलोसिटीच्या संघानं सुपरनोव्हासला सात विकेट्सनं पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सुपरनोव्हासकडून हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) 51 चेंडूत 71 धावांची खेळी केली. एवढेच नव्हे तर, क्षेत्ररक्षण करताना हरमनप्रीत कौरनं अप्रतिल झेल पकडून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, व्हेलोसिटी संघाच्या डावातील दहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर शेफाली वर्मानं जोरात फटका मारला. त्यावेळी हरमनप्रीत कौरनं हवेत उडी मारून एका हातानं झेल पकडला. सध्या सोशल मीडियावर तिनं पकडलेल्या झेलचं कौतूक होताना दिसत आहे. तसेच या झेलचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते तिला 'फ्लाइंग लेडी' आणि सुपरवुमन म्हणत आहेत.
व्हिडिओ-
व्हेलोसिटीचा सुपरनोव्हासवर सात विकेट्सनं विजय
शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि लॉरा वोल्वार्डच्या (Laura Wolvaardt) वादळी अर्धशतकाच्या जोरावर व्हेलोसिटीनं (Velocity) सुपरनोव्हासला (Supernovas) सात विकेट्सनं पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून व्हेलोसिटीच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सुपरनोव्हासच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 150 धावा केल्या. सुपरनोव्हासकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) सर्वाधिक 71 धावांची खेळी केली. व्हेलोसिटीकडून केट क्रॉसनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
हे देखील वाचा-
- WT20 Challenge 2022: शेफाली वर्मा, लॉरा वोल्वार्डची वादळी खेळी; व्हेलोसिटीचा सुपरनोव्हासवर सात विकेट्सनं विजय
- AB de Villiers: टायगर अभी जिंदा है! पुढच्या हंगामात एबी डिव्हिलियर्सची आरसीबीच्या संघात होणार एन्ट्री
- IPL 2022: आयपीएलमधील खास विक्रमापासून युजवेंद्र चहल फक्त एक विकेट दूर, आजच्या सामन्यात रचणार इतिहास?