Virat Kohli : शेवटच्या लीग मॅचपूर्वी विराटचा जीममध्ये कसून व्यायाम, सोशल मीडियावर शेअर केला खास व्हिडीओ
यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली खास कामगिरी करु शकलेला नाही, खराब फॉर्ममध्ये असणारा विराट जीममध्ये मात्र कसून सराव करताना दिसत आहे.
Virat Kohli : आयपीएल 2022 (IPL 2022) 67 वा सामना गुरुवारी रॉयल चँलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या संघामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळवला जाईल. दोन्ही संघाचा लीग मॅचमधील हा शेवटचा सामना असून गुजरात याआधीच प्लेऑफममध्ये पोहोचला आहे, तर बंगळुरुचं पोहोचणं इतर संघाची कामगिरी आणि बंगळुरुची गुजरातविरुद्धची कामगिरी यावर अवलंबून असेल. दरम्यान या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघातील महत्त्वाचा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) जीममध्ये घाम गाळत असून त्याने व्यायामाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.
कोहलीने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर व्यायामशाळेत वेटलिफ्टिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला खास असं कॅप्शनही दिलं आहे.'रिझल्ट आपल्या हातात नसतात, पण मेहनत आणि प्रयत्न करणं मात्र आपल्याच हातात असतं.' असं विराटने या फोटोसोबत लिहिलं आहे.
IPL 2022 विराट कोहलीचे प्रदर्शन
आयपीएलच्या 15 व्या हंगामात विराट कोहलीचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिलेय. विराट कोहली यंदा तीन वेळा शून्यावर बाद झालाय. तर एक वेळा 1 धाव काढून परतलाय. कोलकाताविरोधात 12, राजस्थानविरोधात 5, दिल्लीविरोधात 12, राजस्थानविरोधात 9 धावा काढून बाद झालाय. विराट कोहलीने 13 सामन्यात 20 हून कमीच्या सरासरीने आणि 113 च्या स्ट्राईक रेटने 236 धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये विराट कोहली सहाव्यांदा शून्यावर बाद-
विरुद्ध संघ | गोलंदाजाचं नाव | वर्ष |
मुंबई इंडियन्स | आशीष नेहरा | 2008 |
पंजाब किंग्ज | संदीप शर्मा | 2014 |
कोलकाता नाईट रायडर्स | नाथन कुल्टर नाईल | 2017 |
लखनौ सुपर जायंट्स | दुष्मंता चमीरा | 2022 |
सनरायजर्स हैदराबाद | मार्को जेनसन | 2022 |
सनरायजर्स हैदराबाद | जे सुचित | 2022 |
आयपीएल 2022 मधील विराटचं सामन्यानिहाय प्रदर्शन-
1) 41*(29)
2) 12(7)
3) 5(6)
4) 48(36)
5) 1(3)
6) 12(14)
7) 0(1)
8) 0(1)
9) 9(10)
10) 58(53)
11) 30(33)
12) 0(1)
हे देखील वाचा-
- Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सनं पुन्हा शेअर केला अर्जुन तेंडुलकरचा फोटो, फॅन्स म्हणतात 'एक तरी मॅच खेळवा भावाला'
- IPL 2022: मुंबईच्या संघात मोठा बदल, सूर्यकुमार यादवच्या जागेवर 'या' खेळाडूचा संघात समावेश
- PBKS vs DC: पंजाबकडून जितेश शर्मा एकटाच झुंजला! शार्दुल ठाकूरचा भेदक मारा, दिल्लीचा 17 धावांनी विजय