Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सनं पुन्हा शेअर केला अर्जुन तेंडुलकरचा फोटो, फॅन्स म्हणतात 'एक तरी मॅच खेळवा भावाला'
यंदाच्या हंगामात अत्यंत खराब कामगिरीमुळे मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. पण त्यांचे दोन सामने अजून शिल्लक असून त्यातील एक सामना आज हैदराबाद विरुद्ध असणार आहे.
Arjun Tendulkar Place Mumbai Indians : आयपीएल (2022) स्पर्धेत पाच वेळा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) तब्बल 9 सामने आतापर्यंत गमवावे लागल्याने त्यांच आव्हान संपुष्टात आलं आहे. स्पर्धेतील त्यांचे केवळ दोन सामने शिल्लक असून यामधील एक सामना आज हैदराबाद (MI vs SRH) संघाविरुद्ध असेल. दरम्यान या सामन्यात तरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी मिळणार का? याकडे मुंबई इंडियन्स फॅन्सचे लक्ष लागून आहे. त्यात सामन्यापूर्वी सोमवारी मुंबई इंडियन्सने अर्जूनचा चेंडू हातात पकडलेला एक फोटो शेअर केल्याने आता तरी अर्जूनला संधी मिळणार का या चर्चेला आणखीच उधाण आलं आहे.
काय आहे पोस्ट?
अर्जून एक अष्टपैलू असला तरी त्यांच्या दमदार उंचीमुळे तो भेदक गोलंदाजी करतो. दरम्यान मुंबई इंडियन्सने अर्जूनचा चेंडू हातात पकडलेला एक फोटो शेअर केला असून त्याला हटके कॅप्शन दिले आहे. 'स्लोवर बॉल टाकू कि फास्टर यॉर्कर, अशा दोन विचारांत अर्जून असावा.' असं कॅप्शन मुंबईने दिलं आहे.
दरम्यान हा फोटो मुंबई आणि हैदराबाद सामन्यापूर्वी शेअर केल्याने फॅन्सकडून आतातरी अर्जूनला संधी द्यावी अशी मागणी होत आहे. अनेक पोस्ट आणि मीम्स सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहेत.
मागील वर्षीही अर्जूनला मिळाली नव्हती संधी
आयपीएल 2021 मध्ये सर्वात आधी मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राईसला अर्जूलना संघात घेतलं होतं. पण संपूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यानंतर यंदा आयपीएल 2022 च्या महालिलावात त्याच्या 20 लाख बेस प्राईसवर गुजरात टायटन्सने 25 लाखांची बोली लावली. ज्यानंतर मुंबईने 30 लाखांची बोली लावत त्याला विकत घेतलं. त्यामुळे यंदातरी त्याला संधी मिळणार का हे तरी पाहावं लागेल.
हे देखील वाचा-