IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं
IPL 2024 : सामन्यावेळी आणि सामन्यानंतर खेळाडूंचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यामुळे खेळाडूंना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो.
IPL 2024 : सामन्यावेळी आणि सामन्यानंतर खेळाडूंचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यामुळे खेळाडूंना अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. आमचं काही वैयक्तीक आयुष्य आहे की नाही... असा सवाल रोहित शर्माने ब्रॉडकास्टरला विचारलाय. रोहित शर्मानं खासगी आय़ुष्यातील ढवळाढवळीवर प्रश्न उपस्थित केलाय. रोहित शर्माची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएलमधील आपल्या आवडच्या खेळाडूचा प्रत्येक क्षण चाहत्यांना पाहायला आवडते. तीच नस पकडून ब्रॉडकास्टरकडून खेळाडूंवर कॅमेऱ्यातून फोकस करतात. पण यामुळे खेळाडूंना मनस्ताप सहन करावा लागतो. रोहित शर्माने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, तो अभिषेक शर्मासोबत चर्चा करत होता. त्यावेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावरुन वाद उपस्थित झालाय. रोहित शर्माने ब्रॉडकास्टरला फटकारत आपली भूमिका स्पष्ट केलाय. खासगी बोलणं प्रसारित केल्यामुळे रोहित शर्माला राग अनावर झालाय. तो चांगलाच भडकलाय.
रोहित शर्माने काय म्हटलेय पोस्टमध्ये -
रोहित शर्माने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. रोहित शर्माने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, "क्रिकेटपटूंचे जीवन इतके कठीण झाले आहे की, सराव करताना किंवा सामन्याच्या दिवशी मित्र आणि सहकारी खेळाडूंसोबतचे खासगी संभाषण देखील कॅमेऱ्यांद्वारे रेकॉर्ड केले जात आहे. मी स्टार स्पोर्ट्सला माझे संभाषण थेट टीव्हीवर प्रसारित करु नका, अशी विनंती केली होती. पण तरीही देखील अद्याप ते दाखवले जात आहे. खासदी संभाषण लाइव्ह टीव्हीवर दाखवण्यात आले, जे माझ्या प्रायव्हेसीसोबत खेळण्यासारखे आहे. एक्सक्लूजिव कंटेन्ट आणि अधिक युजर्ससाठी हे केले जाते. पण एक दिवस चाहते, क्रिकेट आणि खेळावरील विश्वास गमावेल."
He is referring to this video
— ICT Fan (@Delphy06) May 19, 2024
pic.twitter.com/gSDHaaML8h
रोहित शर्माला राग का आला ?
मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू धवल कुलकर्णी याच्यासोबत रोहित शर्मा बातचीत करत होता. रोहित शर्माने ऑडिओ बंद करण्याची विनंती केली होती. पण त्या व्हिडीओनं रोहित शर्माची वाट लागली. त्याशिवाय याआधी अभिषेक शर्मा याच्यासोबत रोहित शर्मा बातचीत करत होता. त्यावेळी रोहितने म्हणाला होता की मुंबई इंडियन्स हे त्याच्यासाठी घरासारखे आहे. हा आपला 'लास्ट' असेल असेही तो म्हणाला होता. पण 'लास्ट' हा शब्द कशासाठी वापरला गेला आहे याबद्दल कोणतीही स्पष्टता नव्हती. तरीही, लोकांनी रोहितचा एमआयसोबतचा शेवटचा हंगाम असेल असा अंदाज बांधायला सुरुवात केली होती. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे रोहित शर्मा संतप्त झाला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपला राग व्यक्त केला.