Rohit Sharma MI vs DC IPL 2025: रोहित शर्माने सोपा झेल सोडला; हार्दिक पांड्याने हिटमॅनला थेट मैदानाबाहेर पाठवले?, VIDEO
Rohit Sharma MI vs DC IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्माला फलंदाजीमध्ये जास्त धावा करता आल्या नाहीत. रोहित शर्मा 5 धावा करत मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

Rohit Sharma MI vs DC IPL 2025: आयपीएल 2025च्या हंगामात काल (22 मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians Vs Delhi Capitals) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारत 59 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबई इंडियन्सने प्ले ऑफच्या फेरीत प्रवेश मिळवला.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्माला (Rohit Sharma) फलंदाजीमध्ये जास्त धावा करता आल्या नाहीत. रोहित शर्मा 5 धावा करत मुस्तफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर, रोहित शर्माने क्षेत्ररक्षण करताना एक सोपा झेल सोडला, ज्यामुळे पुढच्या षटकात तो मैदानाबाहेर बसल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हार्दिकने रोहितला मैदानाबाहेर पाठवले?, VIDEO:
दिल्लीच्या डावाच्या पाचव्या षटकात, रोहित शर्माने मिशेल सँटनरच्या गोलंदाजीवर विप्रज निगमचा सोपा झेल सोडला. झेल सुटल्यानंतर रोहित शर्मालाही स्वत:वर राग आला. त्यानंतर पुढच्याच षटकात रोहित शर्मा मैदानाबाहेर गेला आणि त्याच्या जागी कर्ण शर्मा मैदानात आला. सामना पूर्ण होईपर्यंत रोहित पुन्हा मैदानात आला नाही. त्यामुळे रोहित शर्माने झेल सोडल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याला मैदानाबाहेर पाठवले अशी चर्चा नेटकरी सोशल मीडियावर करताना दिसत आहे. परंतु रोहित शर्मा आतापर्यंत सर्व सामन्यात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना दिसला. त्यामुळे मुंबई इंडियन्स जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा, कर्ण शर्मा रोहित शर्माच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरला.
— VK18 (@JiteshSharmaFC) May 21, 2025
MI subbed Rohit Sharma after that 😭😂 pic.twitter.com/zcrMUWKJId
— HemaPriya (@attitudegirl___) May 21, 2025
सामना कसा राहिला?
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 20 षटकांत 5 बाद 180 धावा केल्यानंतर मुंबईने दिल्लीला 18.2 षटकांत 121 धावांमध्ये गुंडाळले. सूर्यकुमार यादवचे तडाखेबंद अर्धशतक आणि मिचेल सेंटनरने घेतलेले ३ बळी मुंबईच्या विजयात मोलाचे ठरले. या पराभवासह दिल्लीचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हानही संपुष्टात आले. सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली आणि 43 चेंडूंचा सामना करत 7 चौकार आणि 4 षटकारांसह 73 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीदरम्यान, सूर्यकुमारने 36 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्य कुमार आणि नमन धीर यांनी शेवटच्या दोन षटकांत दिल्लीच्या गोलंदाजांना फटकारले आणि एकूण 48 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि मिशेल सँटनर यांनी शानदार गोलंदाजी केली. सँटनरने 4 षटकांत 11 धावा देऊन 3 फलंदाजांना आऊट केले. जसप्रीत बुमराहनेही 3.2 षटकांत 12 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
Dominant victory ✅
— IndianPremierLeague (@IPL) May 21, 2025
Playoffs ✅
A dream outing for #MI in their last match at Wankhede this season as they secure a 59-run win over #DC 💙👏
Scorecard ▶ https://t.co/fHZXoEJVed#TATAIPL | #MIvDC | @mipaltan pic.twitter.com/mitYRgtqlZ





















