एक्स्प्लोर

Video: 23 वर्षीय नवीन उल हक, केवळ विराटच नव्हे तर आफ्रिदी, परेरा आणि डॉर्सीलाही भिडला!

नवीन उल हक फक्त विराट कोहलीसोबत नव्हे तर पाकिस्तान, श्रीलंका अन् ऑस्ट्रेलियातही खेळाडूंना भिडला आहे. 

IPL 2023 Virat Kohli, Naveen-ul-Haq : लखनौ आणि आरसीबी यांच्यातील सामना वादामुळेच जास्त गाजलाय. दोन दिवसानंतरही या सामन्याची चर्चा सुरु आहे. विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यापासून सुरु झालेला वाद गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यापर्यंत पोहचला. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात बाचाबाची झाली. लखनौच्या फलंदाजीवेळी 17 व्या षटकात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये वाद झाला होता. दोघांनीही एकमेंकांना खुन्नस दिली होती. अमित मिश्रा आणि पंचांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शमला होता. पण सामन्यानंतर या वादाला वेगळेच वळण लागले. नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यातील वाद सध्या चर्चेत आहे. मी इथे अब्युस व्हायला आलो नाही... असे स्टेटमेंट नवीन उल हक याने दिले. त्यानंतर त्याची सोशल मीडियात चर्चा सुरु झाली. 

नवीन उल हक हा 23 वर्षीय अफगाणिस्थानचा गोलंदाज आहे. नवीन उल हक याची वाद करण्याची पहिलीच वेळ नाही. विराट कोहलीआधी नवीनचा वाद इतर खेळाडूंसोबतही झालाय. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. नवीन उल हक याने पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया येथील क्रिकेट लीग स्पर्धेत वाद घातला होता. त्याला त्यावेळी आर्थिक दंडाची शिक्षा सुणावण्यात आली. पण त्याच्या वर्तनात बदल दिसून आला नाही. सोमवारी आरसीबीविरोधात विराट कोहलीसोबत नवीन उल हक भिडला... मैदानावर तर दोघांमध्ये राडा झालाच. पण सामन्यानंतर हस्तअंदोलन करताना नवीन याने विराट कोहलीचा हात झिडकारत वादाला फोडणी दिली. त्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद विकोलापाला गेला. 

Naveen-ul-Haq vs Mohammad Amir, Shahid Afridi
नवीन उल हक याने 2020 मध्ये पाकिस्तान प्रिमिअर लीग स्पर्धेतही सिनिअर खेळाडूंसोबत वाद घातला होता. शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद आमिर यांच्यासोबत नवीन उल हक याचे वाजले होते. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नवीनसोबतच्या वादानंतर शाहिद आफ्रिदीने ट्वीट करत सिनिअर खेळाडूंचा सन्मान करण्याचा सल्ला दिला होता. पण सोशल मीडियावरही नवीन याने उलट उत्तर दिले होते. 

Naveen-ul-Haq vs Thisara Perera in LPL
2021 मध्ये श्रीलंका प्रिमिअर लीगमध्येही नवीन उल हक याने थिसारा परेरा याच्यासोबत वाद घातला होता. थिसरा परेरा फलंदाजी करत होता.. तर नवीन गोलंदाजी करत होता. परेराने एका चेंडूवर दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नवीन उल हक त्याला आडवा गेला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. पंचांनी हा वाद सोडवला. 

Naveen-ul-Haq vs D’Arcy Short in BBL

ऑस्ट्रेलियातील बीग बॅश लीग स्पर्धेतही नवीन याने वाद घातला होता. डार्सी शॉर्ट याच्यासोबत 2023 मध्ये नवीन याने वाद घातला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतोABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Maharashtra Vidhansabha election 2024: काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
काँग्रेससाठी शिवसेनेचा अर्ज मागे, आनंद मात्र भाजपाला, अतुल सावेंनी खैरेंचे थेट पाय धरले; औरंगाबाद पूर्वमध्ये घडतंय काय? 
Embed widget