एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MI vs RR, IPL 2023 : मुंबई इंडियन्सची ऐतिहासिक कामगिरी, वानखेडे स्टेडिअमवर रचला नवा विक्रम

Mumbai Indians Record on Wankhede Stadium : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडिअमवर इतिहास रचला आहे. वानखेडे स्टेडिअम 200 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात यश मिळवणार मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे.

IPL 2023 MI vs RR, Match 42 : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स (MI vs RR) विरुद्धच्या रोमांचक सामन्यात विजय मिळवला. मुंबईने राजस्थान रॉयल्सवर सहा विकेट्सने विजय मिळवला. यशस्वी जैस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सात गडी गमावून 212 धावा केल्या. जैस्वालने 62 चेंडूत 16 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 124 धावांची खेळी केली. त्याचबरोबर या मोसमात तिसऱ्यांदा मुंबईविरुद्ध एका संघाने 200 हून अधिक धावा केल्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला शेवटच्या षटकात 17 धावांची गरज होती. टीम डेव्हिड शेवटच्या षटकातील पहिल्या 3 चेंडूत 3 षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच कोणत्याही संघाने 200 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीरित्या पार केलं आहे. 

वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सची ऐतिहासिक कामगिरी

वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्सने नवा इतिहास रचला आहे. वानखेडे स्टेडिअम 200 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात यश मिळवणार मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकात 7 गडी गमावून 212 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 19.3 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच एका संघाला 200 हून अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना यश मिळालं आहे.

आयपीएलच्या इतिहासातील हा 1000 वा सामना

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील हा 1000 वा सामना होता. मुंबईने राजस्थानवर दणदणीत विजय मिळवून या सामना अविस्मरणीय ठरवला आहे. वानखेडेवर 200 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मुंबई संघाने यशस्वीरित्या केला. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर रविवारी (20 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील चौथ्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग मुंबई संघाने केला.

मुंबईचा राजस्थानवर सहा विकेटने विजय

सुर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि टीम डेविडच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने राजस्थानचा सहा विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 212 धावांचे आव्हान मुंबईने तीन चेंडूत आणि सहा विकेट राखून यशस्वी पार केले. राजस्थानचा पराभव करत मुंबईने रोहित शर्मा याला वाढदिवसाचे गिफ्ट दिले. यशस्वी जयस्वाल याची शतकी खेळी व्यर्थ गेली. सुर्यकुमार यादव याने 55 धावांची खेळी केली. तर टीम डेविड याने अखेरीस 14 चेंडूत 45 धावांचा पाऊस पाडला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sandeep Sharma IPL : 19 मीटरचं अंतर उलट दिशेनं धावत संदीप शर्माची अफलातून कॅच, पाहून तुम्हीही व्हाल फॅन; व्हायरल Video एकदा पाहाच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 PmMahayuti On CM Post : मुख्यमंत्री नक्की कोण होणार? शिरसाट, आठवले आणि उदय सामंतांची लक्षवेधी प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Embed widget