Video : घणो घणो आभार! घरच्या मैदानात रॉयल विजयानंतर राजस्थानचा चाहत्यांना कडक सॅल्युट
IPL 2024 RR vs MI: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यान राजस्थानने 9 गड्यांनी विजय मिळवला.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात झालेल्या सामन्यान राजस्थानने 9 गड्यांनी विजय मिळवला. मुंबईला राजस्थानने संदीप शर्माच्या भेदकतेच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 179 धावांवर रोखले. हे लक्ष्य राजस्थानने 18.4 षटकांत 1 बाद 183 धावा करून पार केले. यशस्वी-जॉस बटलर यांनी 48 चेंडूंत 74 धावांची सलामी दिल्यानंतर यशस्वीने कर्णधार संजू सॅमसनसोबत 65 चेंडूंत नाबाद 109 धावांची भागीदारी करत संघाचा विजय स्पष्ट केला.
राजस्थानने काल झालेला मुंबई इंडियन्सविरुद्धचा हा सामना घरच्या मैदानावर खेळला. यावेळी मैदानात उपस्थित राहिलेल्या सर्व प्रेक्षकांचे राजस्थानच्या संघाने आभार मानले. सामना जिंकल्यानंतर राजस्थानचे सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ यांनी सवाइ मानसिंग संपूर्ण मैदानावर फेरफटका मारला. यावेळी 'घणो घणो आभार...', असंही बॅनरवर लिहिण्यात आले होते.
Rajasthan Royals thanking the Jaipur crowd. 👏
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 23, 2024
- A great gesture by RR! pic.twitter.com/9rUEUlSGjo
चहलने रचला इतिहास-
मुंबईचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीला बाद करत चहलने आयपीएलमधील 200 वी विकेट घेतली. चहल आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे चहलने मुंबई इंडियन्सच्या संघातूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. चहल 2022 रोजी राजस्थानच्या संघात दाखल झाला होता. चहलने 153 सामन्यात 200 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने सहावेळा चार विकेट्स, तर एकवेळा 5 विकेट्स पटकावण्याची कामगिरी केली.
राजस्थानचं प्ले ऑफमधील स्थान जवळपास निश्चित-
HISTORIC MOMENT IN IPL. 🫡
— Johns. (@CricCrazyJohns) April 22, 2024
- Chahal becomes the first bowler to complete 200 wickets in the history of the league. pic.twitter.com/ZSC7GZpnZ4
मुंबई इंडियन्सचा पराभव करून राजस्थान रॉयल्सने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान मजबूत केले आहे. आता राजस्थान रॉयल्सचे 8 सामन्यांत 14 गुण झाले आहेत. त्याच वेळी, दुसऱ्या स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये 4 गुणांचे अंतर आहे. मात्र, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता मुंबई इंडियन्सचे 8 सामन्यांत 6 गुण झाले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या:
राजस्थान अव्वल स्थानी कायम, मुंबई सातव्या क्रमांकावर; जाणून घ्या, आयपीएलचे Latest Points Table
'मला अजिबात आवडत नाही...'; सामना गमावल्यानंतरही चेहऱ्यावर स्मितहास्य कायम, हार्दिक काय म्हणाला?