एक्स्प्लोर

Sandeep Sharma: लिलावात अनसोल्ड, रिप्लेसमेंट म्हणून संघात दाखल; 50 लाखांमध्ये खरेदी केलेला संदीप शर्मा भावूक

Rajasthan Royals Sandeep Sharma: संदीप शर्माच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

Sandeep Sharma RR vs MI IPL 2024: राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात झालेल्या सामन्यान राजस्थानने 9 गड्यांनी विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयात वेगवान गोलंदाज संदीप शर्माचा मोठा वाटा आहे. मुंबईला राजस्थानने संदीप शर्माच्या भेदकतेच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 179 धावांवर रोखले. तर या सामन्यात संदीपने 5 विकेट्सही घेतल्या. 

संदीप शर्माच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. याआधी कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यातून दुखापतीमुळे संदीप शर्माला माघार घ्यायला लागली होती. त्यानंतर मुंबईविरुद्ध त्याने जोरदार पुनरागमन केले. यावेळी संदीप शर्माने आयपीएलच्या लिलावात अनसोल्ड राहिल्याची देखील आठवण करुन दिली. 

संदीप शर्मा नेमकं काय म्हणाला?

सामन्याच्या एक दिवसाआधीच मी पूर्णपणे तंदुरुस्त झालो. मी गोलंदाजीत विविधता आणण्याचा प्रयत्न केला. खेळपट्टी संथ  होती, त्यामुळे गोलंदाजीत विविधता आणि कटर ठेवण्याची माझी योजना होती. तुम्हाला माहिती आहेच, मला दोन वर्षांपूर्वी आयपीएलच्या लिलावात कोणीच खरेदी केले नव्हते. मी रिप्लेसमेंट म्हणून राजस्थानच्या संघात दाखल झालो होतो. त्यामुळे मी प्रत्येक सामन्याचा आनंद घेत आहे, असं संदीप शर्माने सांगितले. 

आयपीएलच्या लिलावात अनसोल्ड-

2023 साली राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला होता. यामुळे प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संदीप शर्माचा संघात समावेश करण्यात आला. गेल्या मोसमातही संदीप शर्माने राजस्थान रॉयल्ससाठी अप्रतिम कामगिरी केली होती. या हंगामातही संदीप शर्माची जादू कायम आहे. संदीप शर्मा अनेकदा मुंबई इंडियन्सविरुद्ध दमदार गोलंदाजी करतो. राजस्थान रॉयल्सने संदीप शर्माला त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच 50 लाखांमध्ये खरेदी केले होते. संदीप शर्माने संघाचा हा निर्णय अद्याप चुकीचा ठरू दिलेला नाही. याआधी पंजाब किंग्स आणि हैदराबादच्या संघाकडून संदीप शर्मा खेळला आहे. 

जैस्वालची शतकी खेळी-

यशस्वी-जॉस बटलर यांनी 48 चेंडूंत 74 धावांची सलामी दिल्यानंतर यशस्वीने कर्णधार संजू सॅमसनसोबत 65 चेंडूंत नाबाद 109 धावांची भागीदारी करत संघाचा विजय स्पष्ट केला. सुमार गोलंदाजीसह गचाळ क्षेत्ररक्षणाचा मुंबईला फटका बसला. निर्णायक क्षणी मुंबईकरांनी दोन सोपे झेल सोडले. जैस्वालने दुसरे आयपीएल शतक झळकावले. जैस्वालने 60 चेंडूत 104 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने 9 चौकार आणि 7 षटकार मारले. 

गुणतालिकेची काय स्थिती-

सध्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 8 सामने खेळले असून 7 सामने जिंकले, तर एक सामन्यात पराभव झाला. राजस्थानचे सध्या 14 गुण आहेत. कोलकाता नाइट रायडर्स 10 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने 7 सामन्यात 5 सामने जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद देखील 10 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईचा संघाने 7 सामन्यात 4 विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. लखनौचा संघ 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. लखनौने 7 सामन्यात 4 विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 8 गुणांसह सहाव्या क्रमांकावर, मुंबई इंडियन्स 6 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईचा 8 सामन्यात 3 विजय आणि 6 पराभव झाला आहे. दिल्लीचा संघ 4 गुणांसह आठव्या स्थानावर असून पंजाब 4 गुणांसह नवव्या, तर बंगळुरुचा संघ 2 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या:

राजस्थान अव्वल स्थानी कायम, मुंबई सातव्या क्रमांकावर; जाणून घ्या, आयपीएलचे Latest Points Table

'मला अजिबात आवडत नाही...'; सामना गमावल्यानंतरही चेहऱ्यावर स्मितहास्य कायम, हार्दिक काय म्हणाला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget