एक्स्प्लोर

IPL 2023 : शुभमन गिलची सलामी अन् राशिदचा फिनिशिंग टच, गुजरातचा चेन्नईवर विजय

IPL 2023 : शुभमन गिलच्या अर्धशतकानंतर राशिद खान याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. 

IPL 2023, CSK vs GT : शुभमन गिलच्या अर्धशतकानंतर राशिद खान याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. शुभमन गिल याने 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मोक्याच्या क्षणी राशिद खान याने तीन चेंडूत 10 धावांची खेळी केली. गुजरातने चेन्नईचा दहा विकेटने पराभव केला. चेन्नईने दिलेले 179 धावांचे आव्हान गुजरातने चार चेंडू आणि पाच विकेट राखून पार केले. चेन्नईकडून राजवर्धन हंगार्केकर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तुषार देशपांडे आणि जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

गुजरातचा हा चेन्नईविरोधातील सलग तिसरा विजय होय. गेल्या हंगामात गुजरातने चेन्नईचा दोन वेळा पराभव केला होता. त्यानंतर 16 व्या हंगामाची सुरुवातही गुजरातने विजयाने केली आहे.

शुभमन गिलची अर्धशतकी खेळी - 

गुजरातचा सलामी फलंदाज शुभमन गिल याने 63 धावांची खेळी केली.चेन्नईचा इम्पॅक्ट प्लेअर तुषार देशपांडे याने गिल याला बाद केले. गिल याने 36 चेंडूत 63 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान गिल याने तीन षटकार आणि सहा चौकार लगावले. गिल याने साहासोबत पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागिदारी केली. त्यानंतर  साई सुदर्शनसोबत 53 धावांची भागादारी केली. 

इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्ट - 

चेन्नई आणि गुजरातच्या इम्पॉक्ट प्लेअरने आपला इम्पॅक्ट पाडला. चेन्नईकडून तुषार देशपांडे याने सेट झालेल्या गिल याला बाद केले. गिल याने अर्धशतकी खेळी केली. तर गुजरातचा इम्पॅक्ट प्लेअर साई सुदर्शन याने 22 धावांची छोटेखानी खेळी केली. त्याने गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागिदारी केली. विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्यामुळे गुजरातने साई सुदर्शन याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी उतरवले होते. 

हार्दिक पांड्याची फ्लॉप कामगिरी - 

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. हार्दिक पांड्या फलंदाजीत आणि गोलंदाजीत अपयशी ठरला. गोलंदाजीत हार्दिक पांड्याला एकाही विकेट घेता आली नाही. तीन षटकात त्याने 28 धावा खर्च केल्या. तर फलंदाजीत हार्दिक पांड्याला 11 चेंडूत फक्त 8 धावा करता आल्या. विजय शंकर याने मोक्याच्या क्षणी आपली विकेट फेकली.  विजय शंकरला चांगली सुरुवात मिळाली होती. 

दरम्यान, मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या विस्फोटक अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने सात विकेटच्या मोबद्लायत 178 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड याने 92 धावांची खेळी केली. तर धोनीने अखेरच्या षटकात चौकार आणि षटकार लगावले. धोनीने 7 चेंडूत 14 धावांचे योगदान दिलेय. गुजरातकडून मोहम्मद शामी, राशिद खान आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.  

नाणेफेकीचा कौल हार्दिकच्या बाजूने - 

गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या काही षटकात गुजरातने चेन्नईच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. दोन षटकात फक्त दोन धावा करता आल्या होत्या. पण त्यानंतर ऋतुराज गायकवाड याने फटकेबाजी केली.

ऋतुराजचा वन मॅन शो - 

एका बाजूला विकेट पडत असताना मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 92 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ऋतुराज गायकवाड याने 9 षटकार आणि चार चौकार लगावले. अल्जारी जोसेफ याने धोकादायक ऋतुराजला बाद केले. 

जाडेजा, रायडू, कॉनवे अन् स्टोक्सचा फ्लॉप शो - 

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून खेळत आहे. चेन्नईने कोट्यवधींची बोली लावत स्टोक्सला ताफ्यात घेतले. पण पहिल्याच सामन्यात स्टोक्सला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. स्टोक्स अवध्या सात धावा काढून बाद झाला. सहा चेंडूत एका चौकाराच्या मदतीने सात धावा केल्या.  स्टोक्सला राशिद खान याने बाद केले. स्टोक्सशिवाय अंबाती रायडूलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. रायडूला फक्त 12 धावा करता आल्या. यामध्ये त्याने एक षटकार लगावला. तर कॉनवे याला एक धाव करता आली. कॉनवे शामीचा शिकार झाला. सहा चेंडूत कॉनवेला एक धाव करता आली. जाडेजालाही मोठी खेळी करता आली नाही. जाडेजा अवघी एक धाव काढून बाद झाला.

चांगल्या सुरुवातीनंतर मोईन झाला बाद - 

कॉनवे स्वस्तात माघारी परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांनी चेन्नईचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागिदारी केली. पण ही जोडी राशिद खान याने तोडली. राशिद खान याने मोईन अलीला बाद केले. मोईन अलीला चांगली सुरुवात मिळाली होती. मोईन अली याने 17 चेंडूत 23 धावांचे योगदान दिले. यादमर्यान त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. 

शामीचे बळीचे शतक - 

गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याने चेन्नईचा सलामी फलंदाज डेवन कॉनवे याला बाद करत खास विक्रम केला. शामीचा चेंडू कॉनवेला समजला नाही. या विकेटसह शामीने आयपीएलमध्ये 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला. मोहम्मद शामीने आयपीएमलमधील पहिली विकेट क्लिन बोल्डच्या स्वरुपात घेतली होती. तर 50 वी आणि 100 विकेटही त्याने अशीच घेतली. 

आयपीएलची दिमाखात सुरुवात -

अरिजीत सिंह याने आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर रश्मिका मंधाना आणि तमन्ना भाटिया यांच्या डान्सवर उपस्थित प्रेक्षक थिरकले. कलाकारांच्या दमदार परफॉर्मनंतर आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  

पांड्याची ग्रँड एन्ट्री -

ओपनिंग सरेमनीमधील परफॉर्मन्स झाल्यानंतर स्टेजवर बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि आयपीएल चेअरमन अरुण सिंह धूमाल आले होते. त्याशिवाय चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या यांनाही स्टेजवर आमंत्रित करण्यात आले. हार्दिक पांड्याची ग्रँड एन्ट्री झाली. पांड्या छोट्या कारमधून स्टेजवर आला होता. त्यावेळी त्याच्या हातात आयपीएलची ट्रॉफी होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget