IPL 2020 : सीएसकेच्या विजयामुळे बदलली Points Table ची समीकरणं; केएल. राहुलला फायदा, तर शमीला नुकसान
IPL 2020 : सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्सला फायदा झाला आहे. तर धोनीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या चेन्नईच्या संघाने पंजाबवर मात करत विजय मिळवल्यामुळे पॉइंट टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर कूच केली आहे.
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये रविवारी झालेल्या डबल हेडरनंतर पॉइंट टेबलची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात मिळालेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्सला फायदा झाला आहे. तर धोनीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या चेन्नईच्या संघाने पंजाबवर मात करत विजय मिळवल्यामुळे पॉइंट टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर कूच केली आहे. किंग्स इलेव्हन पंजाब आणि सीएसकेच्या सामन्यात शेन वॉटसन आणि फाफ ड्यू प्लेसिसच्या अभेद्य सलामीमुळे ऑरेंज कॅप मिळवण्यासाठीची चुरस आणखी रंगतदार होणार आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने मंयक अग्रवालला मागे टाकत ऑरेंज कॅपवर कब्जा केला होता. तसेच पर्पल कॅपच्या रेसमध्ये मोहम्मद शमीला नुकसानाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई इंडियन्सने आपले पाचपैकी तीन सामने जिंकत पॉइंट टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट चढाच राहिला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने +1.21 च्या नेट रन रेटसोबत पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नावे आणखी एक विक्रम
दिल्ली कॅपिटल्सचा संघ चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या संघाचा नेट रन रेट +0.59 आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा नेट रन रेट -0.95 सह 6 पॉइंट्स घेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
कोलकाता नाईट रायडर्स 4 पॉइंट्स आणि -0.12 च्या नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स -0.32च्या नेट रन रेटसह चार पॉइंट्ससोबत पाचव्या क्रमांकावर आहे.
A look at the Points Table after Match 18 of #Dream11IPL pic.twitter.com/2RZvgU70KB
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
सीएसकेने रविवारी आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधील आतापर्यंतचा सर्वात धामेकदार विजय मिळवला आहे. किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यात सीएसकेने 10 विकेट्सनी पंजाबचा धुव्वा उडवला असून पॉइंट टेबलमध्ये 8व्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर कूच केली आहे. चार पॉइंटसह सीएसकेचा रन रेट -0.34 एवढा आहे.
सनरायझर्स हैदराबादचा संघ 0.42 च्या नेट रन रेट आणि चार पॉइंट्ससह सातव्या क्रमांकावर आहे. किंग्स इलेव्हन पंजाबची स्थिती पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात खराब आहे. हा संघाने +0.18 या नेट रन रेटसह आपले पाचपैकी चार सामने गमावले आहेत.
केएल राहुलची शानदार खेळी
किंग्स इलेव्हन पंजाबला जरी विजय मिळाला नसला तरी, पंजाबची धुरा सांभाळणारा कर्णधार केएल. राहुलने आयपीएलच्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये शानदार खेळी करत 5 सामन्यांत एकूण 302 धावा केल्या आहेत. ही खेळी करत राहुलने ऑरेंज कॅपचा मान मिळवला आहे. याआधी ऑरेंज कॅप मयंक अग्रवालकडे होती. तसेच डू प्लेसी 282 धावा करत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मयंक अग्रवाल 272 धावा करत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
डबल हेडरनंतरही पर्पल कॅपवर चहलकडे आहे. चहलने आतापर्यंत 8 विकेट्स घेतले आहेत. तसेच मोहम्मद शमीच्या खराब इकोनॉमी रेटमुळे आता पर्पल कॅपच्या रेसमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रबाडा दुसऱ्या आणि बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या :