IPL 2020 | महेंद्रसिंह धोनीच्या नावे आणखी एक विक्रम
कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकचा एक नंबरवर आहे. कार्तिकने विकेटकीपर म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक 103 कॅच पकडले आहे.
IPL 2020 : चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीन अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून धोनीवर सतत टीका होत आहे. मात्र धोनीने आज किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात आणखी एक इतिहास रचला आहे. या सामन्यात धोनीने केएल राहुलचा कॅच घेताच विकेटकीपर म्हणून 100 कॅच घेणारा तो आयपीएल इतिहासातील दुसरा खेळाडू ठरला.
या सामन्याआधी धोनीला हा पराक्रम गाठण्यासाठी एक कॅच पकडावा लागणार होता. त्याने पंजाबविरुद्ध राहुलचा कॅच पकडला आणि त्याच्या नावावर हा खास विक्रम नोंदवला गेल्या. आयपीएलमध्ये विकेटकीपर म्हणून धोनीच्या नावे आता 100 कॅच झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या विक्रमाच्या यादीत कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकचा एक नंबरवर आहे. कार्तिकने विकेटकीपर म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक 103 कॅच पकडले आहे.
MS Dhoni adds another feather to his cap. Gets to 100 catches as a wicketkeeper in the IPL 👏👏#Dream11IPL pic.twitter.com/FWNd6Y7FvP
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत चार गडी गमावून 178 धावा केल्या. पंजाबकडून कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 63 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या फलंदाजीमधून सात चौकार आणि एक षटकार खेचला. चेन्नईकडून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने चांगली गोलंदाजी केली. शार्दुलने चार षटकांत 39 धावा देऊन दोन बळी घेतले.