MI Team : मुंबई इंडियन्स संघाच्या सरावादरम्यान मधमाशांचा हल्ला, खेळाडूंचं मैदानातच लोटांगण, VIDEO होतोय व्हायरल
यंदाच्या आयपीएलमध्ये अत्यंत खराब कामगिरीमुळे गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असलेल्या मुंबई संघाच्या सरावातही एक अजब व्यत्यय आला आहे.
Mumbai Indians : आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा चषक उंचावणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians). त्यांनी तब्बल पाच वेळा विजय मिळवला आहे. पण यंदा याच मुंबईने सहा पैकी सहा सामने गमावत दहावं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे त्यांचे चाहते अतिशय निराश आहेत. अशात आता त्यांच्या ट्रेनिंग सेशनदरम्यान अचानकपणे मधमाशांनी हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. यात कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली नसली, तरी मधमाशा भर मैदानात आल्यामुळे खेळाडूंना मैदानातच लोटांगण घालावं लागलं. दरम्यान या सर्वाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मुंबईचा प्रवास खडतर
मुंबई इंडियन्से (MI) यंदा सलग सहा सामने गमावल्यामुळे ते शून्य गुण आणि -1.048 च्या रनरेटसह ते सर्वात शेवटच्या अर्थात दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांना स्पर्धेत राहण्यासाठी उर्वरीत आठ सामन्यांपैकी सात सामने जिंकणं अनिवार्य आहे. हे सर्व सामने चांगल्या रनरेटने जिंकणंही तितकच महत्त्वाचं आहे. पण यंदा आयपीएलमध्ये आठ जागी 10 संघ असल्याने मुंबईला पुढील फेरीत स्थानासाठी उर्वरीत आठ पैकी आठ सामने चांगल्या रनरेटने जिंकण अनिवार्य आहे. कारण पुढील फेरीत एन्ट्रीसाठी 16 गुण गरजेचे असल्याने मुंबई आठ पैकी आठ सामने जिंकल्यासत 16 गुण मिळवू शकते. दरम्यान मुंबईला पुढील फेरीत जाण्यासाठी इतर संघाचा खेळही तितकाच महत्त्वाचा असणार आहे.
मुंबई संघाचे उर्वरीत सामने
गुरुवार, 21 एप्रिल | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | चेन्नई सुपरकिंग्स | सायंकाळी 7.30 वाजता |
रविवार, 24 एप्रिल | वानखेडे स्टेडियम, मुंबई | लखनौ सुपरजायंट्स | सायंकाळी 7.30 वाजता |
शनिवार, 30 एप्रिल | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | राजस्थान रॉयल्स | सायंकाळी 7.30 वाजता |
शुक्रवार, 6 मे | ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई | गुजरात टायटन्स | सायंकाळी 7.30 वाजता |
सोमवार, 9 मे | डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई | कोलकाता नाईट रायडर्स | सायंकाळी 7.30 वाजता |
गुरुवार, 12 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | चेन्नई सुपरकिंग्स | सायंकाळी 7.30 वाजता |
मंगळवार, 17 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | सनरायजर्स हैदराबाद | सायंकाळी 7.30 वाजता |
शनिवार, 21 मे | वानखेडे स्टेडियम, मुंबई | दिल्ली कॅपिटल्स | सायंकाळी 7.30 वाजता |
हे देखील वाचा-
- Mumbai Indians IPL 2022 : मुंबई, चेन्नई संघाला अजूनही पुढील फेरीत पोहोचण्याची संधी; वाचा संपूर्ण गणित
- Virat Kohli IPL Stats: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणार विराट यंदा मात्र फ्लॉप, पाहा या मोसमात कोहलीची कामगिरी
- IPL 2022: अखेरच्या षटकात सामना फिरवणाऱ्या ओबेड मॅकॉयचं भरमैदानात पुष्पा सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ