DC vs RR: संजू सॅमसन झाला 'सिक्सर किंग', रोहित शर्मा आणि एमएस धोनीला टाकलं मागे
Fastest Indian To 200 Sixes in IPL : दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं शानदार फलंदाजी केली.
Fastest Indian To 200 Sixes in IPL : दिल्ली कॅपिटल्सने मंगळवारी राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं शानदार फलंदाजी केली. पण संजू सॅमसन याचं वादळी अर्धशतकही राजस्थानला विजय मिळवून देऊ शकलं नाही. पण संजू सॅमसन यानं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 200 षटकार ठोकण्याचा विक्रम संजू सॅमसन याच्या नावावर जमा झालाय. संजू सॅमसन यानं एमएस धोनी आणि रोहित शर्मा यासारख्या भारतीयांचा विक्रम मोडला आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 200 षटकार ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूमध्ये संजू सॅमसन पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
दिल्लीविरोधात वादळी फलंदाजी करत संजू सॅमसन यानं 86 धावांची खेळी केली. संजू सॅमसन यानं यावेळी आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 200 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. संजू सॅमसन यानं धोनीचा विक्रम मोडीत काढला. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 200 षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूमध्ये धोनी पहिल्या क्रमांकावर होता. आता हा विक्रम संजू सॅमसन याच्या नावावर जमा झालाय. संजू सॅमसन यानं 159 डावात 3081 चेंडूचा सामना करताना 200 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. एमएस धोनीने 165 डावात 3126 चेंडूचा सामना करताना 200 षटकार ठोकले होते. रोहित शर्माने 185 डावात 3798 चेंडूचा सामना करताना 200 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांच्या नावावरील विक्रम आता संजू सॅमसन याच्या नावावर जमा झाला आहे.
SANJU SAMSON IS THE FASTEST TO COMPLETE 200 SIXES AMONG INDIANS IN IPL HISTORY 🤯pic.twitter.com/CJlDJgSO7x
— Johns. (@CricCrazyJohns) May 7, 2024
200 षटकार ठोकणारा 10 वा फलंदाज -
दिल्लीने दिलेल्या 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात यशस्वी जायस्वाल तंबूत परतला. त्यामुळे संजू सॅमसन याला लकरच मैदानार यावं लागले. संजू सॅमसन यानं आपलं आक्रमक रुप धारण केले. संजू सॅमसन यानं पाचव्या चेंडूवरच षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. त्यासह संजू सॅमसन यानं आयपीएलमध्ये 200 षटकारांचा विक्रमही पूर्ण केला. आयपीएलमध्ये 200 षटकार ठोकणारा संजू सॅमसन दहावा फलंदाज ठरला.ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिविलियर्स, एमएस धोनी, डेविड वॉर्नर, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि सुरेश रैना यांनी याआधी आयपीएलमध्ये 200 षटकार लगावले आहेत. संजू सॅमसन सर्वात वेगवान 200 षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरलाय. त्यानं रोहित,धोनी, विराट अन् सुरेश रैना यांना मागे टाकलेय.
Most sixes by Indians in IPL history:
— Johns. (@CricCrazyJohns) May 8, 2024
Rohit - 276 sixes (250 innings)
Kohli - 258 sixes (240 innings)
Dhoni - 248 sixes (227 innings)
Samson - 205 sixes (159 innings)
Raina - 203 sixes (200 innings) pic.twitter.com/guFSAdEh6o