DC vs LSG : खलीलच्या दुखापतीने पंतची चिंता वाढवली, लखनौ-दिल्लीची अशी असेल प्लेईंग 11
DC vs LSG Live, IPL 2022 Marathi News : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघ रविवार दुपारी साडेतीन वाजता वानखडे स्टेडियम आमने-सामने असतील.
DC vs LSG Live, IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघ रविवार दुपारी साडेतीन वाजता वानखडे स्टेडियम आमने-सामने असतील. दोन्ही संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी विजय गरजेचा आहे. त्यामुळेच दोन्ही संघ त्या इराद्याने मैदानात उतरली. लखनौने पंजाबला तर दिल्लीने कोलकात्याचा पराभव केला आहे. आता दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. पाहूयात दोन्ही संघ कोणत्या खेळाडूसोबत मैदानात उतरतील. काय असेल पिच रिपोर्ट....
दिल्लीकडून चायनामन कुलदीप यादव कमालीचा फॉर्ममध्ये आहे. कुलदीप यादव सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुलदीपच्या नावावर यंदा 17 विकेट आहेत. कोलकात्याविरोधात कुलदीपने एकहाती दिल्लीला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे लखनौच्या नवाबांना कुलदीप आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवणार का? हे रविवारी समजेल. पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांचा अपवाद वगळता दिल्लीच्या इतर फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. कर्णधार ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि रॉवमन पॉवेल यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. दिल्लीची सर्वात मोठी चिंता दुसऱ्या क्रमांकावरील फलंदाज होय... मिचेल मार्शला अद्याप मोठी खेळी करता आली नाही.
लखनौसाठी दिलासादायक बाब म्हणजे, सलामी फलंदाज क्विंटन डिकॉक लयीत परतलाय. पंजाबविरोधात महत्वाची 46 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय केएल राहुलची तुफान फॉर्ममध्ये आहे. दीपक हुड्डा, आयुष बडोनी आणि क्रृणाल पांड्या आपले काम चोख बजावत आहेत. मार्कस स्टॉयनिसला मात्र अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. लखनौ संघाची गोलंदाजीची बाजूही मजबूत आहे. रवी बिश्नोई फिरकीची धुरा सांभाळत आहे. आवेश खान, मोहसीन खान यांच्या जोडीला जेसन होल्डर चांगली गोलंदाजी करत आहे.
पिच रिपोर्ट
वानखेडे स्टेडिअमवर सामना खेळला जात आहे. या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. त्याशिवाय रात्री येथे ओस पडण्याची शक्यता आहे. अशात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
खलीलची दुखापत दिल्लीसाठी चिंतेची -
खलील अहमदच्या दुखापतीने दिल्लीची चिंता वाढवली आहे. दुखापतीमुळे खलील मागील सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी चेतन सकारियाला संधी देण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सामन्यातही चेतन सकारियासोबतच दिल्लीचा संघ मैदानात उतरु शकतो. खलील अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याचे समजते.
दिल्लीची संभावित प्लेईंग XI : पृथ्वी शॉ, डेविड वार्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया
लखनौमध्ये बदलाची शक्यता कमीच -
राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सने पंजाबचा पराभव करत दोन गुणांची कमाई केली होती. त्यामुळे लयीत असणारा लखनौ आपल्या संघात बदल करण्याची शक्यता नाही.
लखनौची संभावित प्लेईंग XI : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, कुणाल पांड्या, मार्कस स्टोयनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, मोहसिन खान, अवेश खान, रवी बिश्नोई