एक्स्प्लोर

एमएस धोनीचा 'रॉकेट थ्रो'; अनुज रावतही पाहतच बसला, Video एकदा पाहाच!

CSK Vs RCB: आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी एमएस धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती.

CSK Vs RCB: एमएस धोनीचा (MS Dhoni) आजही दबदबा कायम आहे. वयाच्या 42 व्या वर्षीही धोनीच्या फिटनेसशी कोणी बरोबरी करु शकत नाही हे आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दिसून आले. यष्टिरक्षक म्हणून धोनीने केवळ धावा वाचवल्या नाहीत तर दोन शानदार झेलही घेतले. तसेच डावाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने अनुज रावतला शानदार धावबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

एमएस धोनीने पाचव्या षटकात रजत पाटीदारचा आणि सहाव्या षटकात ग्लेन मॅक्सवेलचा विकेटच्या मागे शानदार झेल घेतला. यानंतर त्याने आरसीबीच्या डावातील शेवटच्या षटकांत अनुज रावतला धावबाद केले. शेवटचा चेंडू जो पाचव्या स्टंपवर फुलर बॉल होता, दिनेश कार्तिकने तो कव्हरच्या दिशेने चालवण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि त्याला एक धावा घ्यायची होती. मात्र विकेटच्या मागे असलेल्या धोनीने चेंडू पकडून लगेच तो विकेटच्या दिशेने फेकला आणि अनुज रावतला बाहेरचा रस्ता दाखवला.

ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान-

आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी एमएस धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. मात्र, धोनीचे नेतृत्व सामन्यादरम्यान सातत्याने पाहायला मिळाले, तेव्हा तो क्षेत्ररक्षणातही बदल करताना दिसला.

चेन्नईने आरसीबीचा केला पराभव-

आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून चेन्नईसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य ठेवले होते. एकेकाळी 78 धावांच्या स्कोअरवर आरसीबी संघाने पाच विकेट गमावल्या होत्या, फाफ डू प्लेसिसने 23 चेंडूत 35 धावा केल्या होत्या आणि विराट कोहलीने 21 धावा केल्या होत्या, तर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांना खातेही उघडता आले नाही. कॅमेरून ग्रीनने 18 धावांचे योगदान दिले. पाच गडी बाद झाल्यानंतर, अनुज रावत आणि दिनेश कार्तिक यांनी सहाव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे संघ 173 धावांपर्यंत पोहोचू शकला. अनुज रावतने 25 चेंडूत 48 तर दिनेश कार्तिकने 26 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या.

संबंधित बातम्या:

CSK Vs RCB: 'दोन-तीन गोष्टींवर काम करायचंय'; सामना जिंकल्यानंतरही ऋतुराज नाखुश, नेमकं काय म्हणाला?

 IPL 2024: 18 मार्चला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर गेला, 4 दिवसांनी परतला अन् चेन्नईला विजय मिळवून दिला

PBKS vs DC Score Live IPL 2024: दिल्ली कॅपिटल्स आज पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार; ऋषभ पंतकडे चाहत्यांचं लक्ष

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam : गुड न्यूज, MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात, महाराष्ट्र गट-क सेवेची पूर्व परीक्षा 'या' दिवशी होणार
गुड न्यूज, एमपीएससीकडून 938 जागांसाठी महाराष्ट्र गट-क सेवेची जाहिरात प्रसिद्ध, 'या' दिवशी पूर्व परीक्षा
Dilip Khedkar : क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
Team India : मला पण कॅप्टन बनायचंय, शुभमन गिलला वनडेचं कर्णधारपद मिळताच युवा खेळाडूची मन की बात
मला पण कॅप्टन बनायचंय, शुभमन गिलला वनडेचं कर्णधारपद मिळताच युवा खेळाडूची मन की बात
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Women's Heart Attack: महिलांमध्ये 'हार्ट अटॅक'चे प्रमाण वाढले, कारणे आणि लक्षणे काय?
Palghar JSW Port Protest | पालघरमध्ये JSW बंदराला तीव्र विरोध, जनसुनावणी पोलीस बंदोबस्तात पार पडली
Kirit Somaiya Kurla : कुर्ल्यात सोमय्या आय लव्ह महादेवचे स्टिकर लावणार, पोलिसांचा मोहिमेला विरोध
Ward Restructuring | ठाणे महापालिका प्रभाग रचनेला विरोध, Jitendra Awhad यांचा कोर्टात जाण्याचा इशारा
Thane Municipal Corporation | ठाणे महापालिकेसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Exam : गुड न्यूज, MPSC कडून 938 जागांसाठी नवी जाहिरात, महाराष्ट्र गट-क सेवेची पूर्व परीक्षा 'या' दिवशी होणार
गुड न्यूज, एमपीएससीकडून 938 जागांसाठी महाराष्ट्र गट-क सेवेची जाहिरात प्रसिद्ध, 'या' दिवशी पूर्व परीक्षा
Dilip Khedkar : क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
क्लिनर अपहरण केस, माजी IAS दिलीप खेडकरच्या जामिनाला पोलिसांचा तीव्र विरोध
Team India : मला पण कॅप्टन बनायचंय, शुभमन गिलला वनडेचं कर्णधारपद मिळताच युवा खेळाडूची मन की बात
मला पण कॅप्टन बनायचंय, शुभमन गिलला वनडेचं कर्णधारपद मिळताच युवा खेळाडूची मन की बात
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
Professor Recruitment : सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला शासनाची मान्यता, निवडीच्या ATR कार्यपद्धतीचा जीआर प्रसिद्ध
सार्वजनिक विद्यापीठांतील अध्यापकांच्या भरती प्रक्रियेला शासनाची मान्यता, नव्या कार्यपद्धतीचा जीआर प्रसिद्ध
TCS Layoffs : टीसीएसमधील कर्मचारी कपातीचा मुद्दा केंद्रीय श्रममंत्र्यांकडे पोहोचला, खासदारानं थेट पत्र लिहून केली मोठी मागणी
टीसीएसमधील कर्मचारी कपातीचा मुद्दा केंद्रीय श्रममंत्र्यांकडे पोहोचला, खासदारानं थेट पत्र लिहून केली मोठी मागणी
Gold Rate : सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, सोन्याचे दर 2105 रुपयांनी वाढले, चांदी 4163 रुपयांनी महागली
सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, सोन्याचे दर 2105 रुपयांनी वाढले, चांदी 4163 रुपयांनी महागली
Share Market : शेअर बाजारात तेजी सुरु, आयटी आणि बँकिंगच्या शेअरमुळं बाजारानं मूड बदलला, जाणून घ्या कारण
शेअर बाजारात तेजी सुरु, आयटी आणि बँकिंगच्या शेअरमुळं बाजारानं मूड बदलला, जाणून घ्या कारण
Embed widget