PBKS vs DC Score Live IPL 2024: पंजाबचा दिल्लीवर चार विकेटनं विजय, आयपीएलची विजयानं सुरुवात
IPL 2024: Punjab Kings vs Delhi Capitals: मागच्या सत्रातील खराब कामगिरी विसरून दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आज आयपीएल 2024 मध्ये उत्कृष्ट सुरुवात करण्याच्या निर्धाराने खेळणार आहेत.

Background
IPL 2024: Punjab Kings vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) टी-20 क्रिकेटमध्ये आज दुपारच्या सत्रात (3.30 वाजता) ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) संघासमोर पंजाब किंग्सचे (PBKS) आव्हान असणार आहे. भीषण अपघातातून बचावल्यानंतर आपल्या जिद्दीच्या जोरावर वर्षभराहून अधिक कालावधीनंतर ऋषभ पंत आज क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. मागच्या सत्रातील खराब कामगिरी विसरून दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स शनिवारी आयपीएल 2024 मध्ये उत्कृष्ट सुरुवात करण्याच्या निर्धाराने खेळणार आहेत.
🐯 🤝 🦁#YehHaiNayiDilli #IPL2024 #PBKSvDC pic.twitter.com/7iy0JYgKoL
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 22, 2024
पंजाबचा दिल्लीवर चार विकेटनं विजय
पंजाबनं 2024 च्या आयपीएलमध्ये विजयी सुरुवात केली आहे. पंजाबनं चार विकेट राखून विजय मिळवला. सॅम करन आणि लिविंगस्टन याच्या खेळीच्या जोरावर पंजाबनं विजय मिळवला.
पंजाबचा दिल्लीवर चार विकेटनं विजय
पंजाबनं 2024 च्या आयपीएलमध्ये विजयी सुरुवात केली आहे. पंजाबनं चार विकेट राखून विजय मिळवला. सॅम करन आणि लिविंगस्टन याच्या खेळीच्या जोरावर पंजाबनं विजय मिळवला.




















