धोनीला पाहण्यासाठी चाहत्याने 64 हजारांची तिकीट घेतली; पण मुलीच्या शाळेची भरली नाही फी!
Chennai Super Kings MS Dhoni: आयपीएलमधील संघाचे फॉलोअर्स पाहिल्यास सर्वात जास्ता फॉलोअर्स चेन्नईच्या संघाचे आहेत.
Chennai Super Kings MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सचे चाहत मोठ्या प्रमाणात आहे. सध्या आयपीएल सुरु असून धोनी जेव्हा मैदानात येतो, तेव्हा चाहत्यांकडून 'धोनी-धोनी' अशा घोषणा दिल्या जातात. आयपीएलमधील संघाचे फॉलोअर्स पाहिल्यास सर्वात जास्ता फॉलोअर्स चेन्नईच्या संघाचे आहेत.
चेन्नईचा संघ जिथे आयपीएलचे सामने खेळायला जातो तिथे धोनी आणि चेन्नईचे चाहते जर्सी घालून आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी पोहोचतात. मागील वर्षी एका चाहत्याने धोनीला पाहण्यासाठी बाईक विकून आलेल्या पैशाने चेन्नईच्या मॅचची तिकीट विकत घेतली होती. याचदरम्यान आता धोनीला पाहण्यासाठी एका चाहत्याने मुलीच्या शाळेची फी भरली नसल्याचं म्हटलं आहे.
स्पोर्ट्सवॉक चेन्नई नावाच्या चॅनलवर एका चाहत्याने त्याच्या मातृभाषेत सांगितले की, चेन्नईचा सामना पाहण्यासाठी त्याने 64 हजार रुपये खर्च केले होते. मैदानात तिकीटाची किंमत 64 हजार रुपये होती असे नाही. चाहत्याने सांगितले की, त्याला तिकीट मिळू शकले नाही, म्हणून तिकीटांचा काळाबाजार करण्यांकडून या सामन्याची तिकीट विकत घेतली आणि एवढी मोठी रक्कम मोजली.
धोनीचा चाहता नेमकं काय म्हणाला?
मला तिकीट मिळू शकले नाही. काळाबाजार करणाऱ्यांकडून मी तिकीट मिळवली. यासाठी मला 64 हजार रुपये द्यावे लागले आणि आता मला माझ्या मुलील्या शाळेची फी भरायची आहे, पण आम्हाला एमएस धोनीला एकदा तरी बघायचे आहे. या चाहत्याला आणि त्याच्या मुलींना मैदानावर खेळताना धोनीची एक झलक पहायची होती, असं तो म्हणाला. मात्र आपल्या मुलीच्या शाळेची फी भरली नसल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. आपल्या मुलींची फी न भरण्याचा आणि फी भरण्याऐवजी मॅच बघायला येण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी त्याला चुकीचे ठरवले आहे.
चाहत्याची मुलगी काय म्हणाली?
सदर चाहत्याची मुलगी म्हणाली की, माझ्या वडिलांनी ही तिकीटं खरेदी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एमएस धोनी खेळायला आला तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. वडील आणि 3 मुलींची ही जोडी चेन्नई संघाचं टी-शर्ट घालून आली आणि चेन्नईच्या समर्थनार्थ शिट्ट्याही वाजवल्या.
पाहा संपूर्ण व्हिडीओ:
I don't have money to pay the School Fees of my children, but spent Rs 64,000 to get black tickets to watch Dhoni, says this father. I am at a loss for words to describe this stupidity. pic.twitter.com/korSgfxcUy
— Dr Jaison Philip. M.S., MCh (@Jasonphilip8) April 11, 2024
संबंधित बातम्या:
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरसारखी दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण?; पाहा Photo's
दिल्लीचा विजय अन् 4 संघांचा क्रम बदलला;चेन्नईला सामना न खेळता फायदा झाला, पाहा IPL Points Table