एक्स्प्लोर

IPL 2024 Latest Points Table: दिल्लीचा विजय अन् 4 संघांचा क्रम बदलला;चेन्नईला सामना न खेळता फायदा झाला, पाहा IPL Points Table

IPL 2024 Latest Points Table: दिल्लीने विजयासह झेप घेतली आहे, तर लखनौला मोठा फटका बसला आहे.

IPL 2024 Latest Points Table: आयपीएल 2024 मधील 26 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने घरच्या संघाचा म्हणजेच लखनौचा 6 विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. दिल्लीने विजयासह झेप घेतली आहे, तर लखनौला मोठा फटका बसला आहे.

लखनौविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर होता. आता दिल्ली 4 गुण आणि -0.975 च्या रन रेटसह नवव्या स्थानावर आली आहे. सामन्यापूर्वी लखनौ तिसऱ्या क्रमांकावर होता, जो आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. लखनौचे 6 गुण आहेत आणि नेट रनरेट +0.436 आहे.

पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स-

आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेला राजस्थान रॉयल्स 8 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स 6-6 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. KKR चा नेट रनरेट +1.528 आणि चेन्नईचा +0.666 आहे.

बंगळुरु तळाला-

सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघ प्रत्येकी 6 गुणांसह पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. हैदराबादचा निव्वळ नेट रनरेट +0.344 आणि गुजरातचा -0.637 आहे. त्याखालोखाल मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स 4-4 गुणांसह अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. मुंबईचा नेट रनरेट -0.073 आणि पंजाबचा -0.196 आहे. त्यानंतर गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तळाच्या 10व्या स्थानावर आहे. आरसीबी हा या हंगामातील एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत केवळ 1 विजय नोंदवला आहे. बंगळुरूने 6 सामने खेळले आहेत, ज्यात फक्त 1 सामना जिंकला आहे.

युवा खेळाडूंचे सामन्यावर वर्चस्व-

लखनौ आणि दिल्लीतील या सामन्यात युवा खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. तत्पूर्वी, लखनौने अवघ्या 74 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या, मात्र त्यानंतर आयुष बडोनीने 35 चेंडूत 55 धावा केल्या आणि अर्शद खाननेही 16 चेंडूत 20 धावा करत लखनौला 167 धावांपर्यंत नेले. दरम्यान, अर्शद खाननेही गोलंदाजीने प्रभावित केले. दुसरीकडे, दिल्लीकडून जेक फ्रेझर मॅकगर्कने पदार्पणाच्याच सामन्यात 55 धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

संबंधित बातम्या:

आयपीएलमध्ये पदार्पण केलं अन् मैदान गाजवलं; 21 वर्षांच्या पठ्ठ्यानं डिव्हिलियर्सचाही मोडलाय विक्रम

ट्रॅव्हिस हेडची पत्नीची पुन्हा एकदा रंगली चर्चा; सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ, पाहा Photo

दिल्लीच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करणाऱ्या रोमारिओ शेफर्डची पत्नी आहे टीव्ही अँकर, पाहा Photo's

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget