(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Axar Patel : आयपीएलमध्ये अक्षर पटेलची खास अष्टपैलू कामगिरी, ही कामगिरी करणारा जगाचीस चौथाच खेळाडू
Axar Patel in IPL : दिल्लीकडून खेळणाऱ्या अष्टपैलू अक्षर पटेलने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी करणारा अक्षर जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.
IPL 2022 : पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात दिल्लीकडून खेळणाऱ्या अक्षर पटेल (Axar Patel) याने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. अक्षर आयपीएलमध्ये 1000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स घेणारा जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये (DY Patil Stadium) सोमवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) यांच्यात सामना पार पडला. आयपीएल 2022 च्या या 64 व्या सामन्यात दिल्लीने पंजाबवर 17 धावांनी विजय मिळवला. दरम्यान सामन्यात दिल्लीच्या अक्षरने नाबाद 17 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली शिवाय रिषी धवनची विकेटही घेतली होती. त्याने केलेल्या या कामगिरीमुळे अक्षर आयपीएलमध्ये 1000 हून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स पूर्ण केल्या आहेत. अक्षरच्या आधी केवळ तीनच खेळाडूंना ही कामगिरी करता आळी असून त्यात रवींद्र जाडेजा हा एकमेवल भारतीय आहे. तर ड्वेन ब्राव्हो आणि सुनील नारायण या खेळाडूंचाही समावेश आहे.
खेळाडूचं नाव | धावा | विकेट्स |
ड्वेन ब्राव्हो | 1560 | 183 |
रवींद्र जाडेजा | 2502 | 132 |
सुनील नारायण | 1004 | 152 |
अक्षर पटेल | 1116 | 101 |
अक्षरची आयपीएलमधील कामगिरी
आजवर अक्षर पटेलने आयपीएलमध्ये 121 सामने खेळले आहेत. त्यातील 87 डावात त्याने 18.92 च्या सरासरीने 1116 धावा केल्या आहेत. 44 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. याशिवाय त्याने 121 सामन्यातील 120 डावात 101 विकेट्स घेतल्या आहेत. 21 धावा देत 4 विकेट्स घेणं त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
दिल्लीचा 17 धावांनी विजय
दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजांनी गुढघे टेकले. दिल्लीकडून शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) उत्कृष्ट गोलंदाजी केली. ज्यामुळं अतितटीच्या सामन्यात दिल्लीच्या संघानं 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून पंजाबसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघाला 20 षटकात 142 धावाचं करता आल्या. पंजाबकडून जितेश शर्मानं (Jitesh Sharma) सर्वाधिक 44 धावांची खेळी केली.
हे देखील वाचा-
- Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सनं पुन्हा शेअर केला अर्जुन तेंडुलकरचा फोटो, फॅन्स म्हणतात 'एक तरी मॅच खेळवा भावाला'
- IPL 2022: मुंबईच्या संघात मोठा बदल, सूर्यकुमार यादवच्या जागेवर 'या' खेळाडूचा संघात समावेश
- PBKS vs DC: पंजाबकडून जितेश शर्मा एकटाच झुंजला! शार्दुल ठाकूरचा भेदक मारा, दिल्लीचा 17 धावांनी विजय