(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Full Match Highlights: राजस्थानचा धावांचा डोंगर सर करण्यात दिल्ली अपयशी, 15 धावांनी पराभव
IPL 2022, DC vs RR: अखेरच्या षटकापर्यंत गेलेला आजचा सामना दिल्लीने 15 धावांनी गमावला असला तरी सामना अत्यंत चुरशीचा झाला आहे.
DC vs RR, Match Highlights: आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजच्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यातील सामन्यात दिल्ली संघाचा 15 धावांनी पराभव झाला. पण अखेरच्या ओव्हपर्यंत सामना पोहोचला होता. त्यात चुरसही अखेरपर्यंत दिसून आली. दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू रोवमेन पॉवेल याने अखेरच्या षटकात 36 धावांची गरज असताना पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकत 18 धावा केल्या होत्या. पण अखरेच्या तीन चेंडूत पॉवेल कमाल करु शकला नाही.
सामन्यात आधी जोस बटलर नावाचं वादळ मैदानात पाहायला मिळालं. बटलरने यंदाच्या हंगमातील तिसरं शतक झळकावलं . त्यामुळे राजस्थानने 223 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंत सर्वाधिक 44 धावा करु शकला. ललितने 37 धावांची तर पॉवेलने 36 धावांची खेळी केली. पण 223 धावाचं आव्हान पूर्ण होऊ न शकल्याने सामना दिल्लीने गमावला.
दिल्लीने उभारला 222 धावांचा डोंगर
नाणेफेक गमावल्यामुळे राजस्थानला प्रथम फलंदाजी करावी लागील. यावेळी बटलरने संयमी खेळी केली त्यानंतर तुफानी फलंदाजी करत शतक झळकावले. यंदाच्या हंगामातील बटलरचं हे तिसरं शतक ठरलं. बटलरने 57 चेंडूत 8 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 101 धावा करत शतक ठोकलं. त्याने सामन्यात 65 चेंडूत 116 धावा केल्या. त्यानंतर मागील हंगाम गाजवलेला देवदत्त यंदा खास फॉर्ममध्ये नसल्याचं दिसत आहे. पण आज त्याने एक दमदार अर्धशतक झळकावत पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं दाखवून दिलं आहे. त्याने आजच्या सामन्यात बटलरसोबत एक उत्तम भागिदारी रचली. त्याने 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत 54 धावा केल्या. सामन्यात 46 धावांची तुफान खेळी कर्णधार संजू सॅमसनने केली. त्याने 19 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार ठोकत 46 धावा झळकावल्या. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानने 222 धावांपर्यंत मजल मारली.
दिल्लीच्या गोलंदाजांच खराब प्रदर्शन
दिल्ली संघाच्या सर्वच गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली आहे. यात सर्वात जास्त धावा खलील अहमदच्या ओव्हरमध्ये आल्या असून त्याच्या 4 षटकात 47 धावा पडल्या आहेत. तर ललित, कुलदीप आणि मुस्तफिजूर यांनाही 40 हून अधिक धावा आल्या आहेत. सामन्या मुस्तफिजूर आणि खलीलने एक-एक विकेट घेतली.
दिल्ली लक्ष्य गाठण्यात अपयशी
दिल्ली संघाची सुरुवातच खराब झाली. वॉर्नर, सरफराज खास प्रदर्शन करु शकले नाही. पृथ्वी आणि पंतने डाव सावरला खरा पण शॉ 37 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर पंत चांगली खेळी करत होता. त्याला ललितने चांगली साथ दिली होती. पण काही मोठे शॉट खेळण्याच्या नादात पंतने विकेट गमावली 44 धावा करुन तो तंबूत परतला आणि रुळावर येणारी दिल्लीची गाडी पुन्हा डळमळली. त्यानंतर ललितसोहत रोवमेन पॉवेलने फटकेबाजी केली. अखेरच्या षटकात दिल्ली जिंकण्याचे चान्सेस दिसत होते. दरम्यान अखेरच्या षटकात 36 धावांची गरज असताना पॉवेलने सलग तीन षटकार ठोकले. पण तिसरा चेंडू नो असल्याचा दावा दिल्लीच्या ताफ्यातून झाला पण पंचानी नो बॉल न दिल्याने काही काळ सामन्यात व्यत्यय आला. पंतने तर फलंदाजांना माघारी बोलावलं होतं. पण इतरांच्या समजावण्यावरुन अखेर सामना सुरु ठेवला गेला. पण पॉवेल उर्वरीत चेंडूत 18 धावा न करु शकल्याने सामना दिल्लीने 15 धावांनी गमावला.
हे ही वाचा