एक्स्प्लोर

CSK vs GT, Match Highlights : गुजरातची विजयी मालिका सुरुच, 7 विकेट्सनं चेन्नईवर विजय

IPL 2022 : यष्टीरक्षक रिद्धिमान साहाने नाबाद अर्धशतक ठोकत गुजरातला चेन्नईवर विजय मिळवून दिली आहे.

CSK vs GT : यंदाच्या आयपीएलमध्ये 2022 (IPL 2022) गुणतालिकेत अव्वल स्थानी असणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने (Gujrat Titans) विजयी मालिका सुरुच ठेवली असून 13 पैकी 10 सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली. पण ते केवळ 133 धावाच करु शकले. ज्या धावा तीन गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत गुजरातने विजयी मालिका कायम ठेवली.

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण गुजरातच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक मात्र्यामुळे चेन्नई केवळ 133 धावाचं करु शकली. सामना सुरु होताच काही वेळात मोहम्मद शामीने भन्नाट फॉर्ममध्ये असणाऱ्या कॉन्वेला साहाकरवी झेलबाद केले. कॉन्वे 5 धावा काढून माघारी परतला. कॉन्वे बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांनी चेन्नईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण साई किशोर याने मोईन अलीला बाद करत गुजरातला दुसरे यश मिळवून दिले. मोईन अलीने 21 धावांची खेळी केली. त्यानंतर गायकवाडने 49 चेंडूत 53 धावांची खेळी केली. राशिद खान याने गायकवाडचा अडथळा दूर केला. अखेरच्या काही षटकात जगदीशन याने 33 चेंडूत नाबाद 39 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 133 धावांपर्यंत नेली.  गुजरातकडून मोहम्मद शामीने चार षटाकत फक्त 19 धावा खर्च करत महत्वाच्या दोन विकेट घेतल्या.  राशिद खान, अल्झारी जोसेफ, आर साई किशोर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. कर्णधार हार्दिक पांड्याने दोन षटके गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याला एकही विकेट मिळाली नाही. पण दोन षटकात फक्त आठ धावा खर्च केल्या.

साहाच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात विजयी
134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरात संघाने साहा आणि गिल जोडीच्या मदतीने चांगली सुरुवात केली. पण पाथिराना याने गिलला 18 धावांवर बाद करत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर मोईनने मॅथ्यू वेडलाही 20 धावांवर बाद केलं. पण साहा दमदार खेळी करतच होता. कर्णधार हार्दिक 7 धावा करुन बाद झाला पण मिलरने नाबाद 15 धावा ठोकत संघाचा विजय पक्का केला. यावेळी साहा याने 57 चेंडूत नाबाद 67 धावा करत संघाला विजय मिळवून दिलं. साहाने यावेळी 8 चौकार आणि एक षटकार ठोकला.  

महत्त्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget