IPL 2022 : चेन्नई-गुजरातचे खेळाडू काळी पट्टी घालून का उतरले मैदानात?
CSK and Gujarat Titans : वानखेडे स्टेडिअमवर चेन्नई आणि गुजरात यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले...
CSK and Gujarat Titans : ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स याचे सकाळी अपघाती निधन झाले. 46 व्या वर्षी अँड्र्यू सायमंड्सने जगाचा निरोप घेता. शेन वॉर्न याच्यानंतर अँड्र्यू सायमंड्सला गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियात आणि क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त केली जातेय. अँड्र्यू सायमंड्सचे आयपीएलसोबतही कनेक्शन आहे.. सायमंड्सने आयपीएलमध्येही आपली छाप सोडली होती. अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी आयपीएलच्या सामन्यात खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते.
वानखेडे स्टेडिअमवर चेन्नई आणि गुजरात यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात दोन्ही संघाचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले... ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहण्यासाठी खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानावर उतरलेत. आयपीएल आणि बीसीसीआयकडूनही सायमंड्सला श्रद्धांजली वाहण्यात आली.. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामना सुरु होण्याआधी सायमंड्सला श्रद्धांजली वाहण्यात आली.
Rest In Peace, Andrew Symonds.
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
Your presence around the game will be missed. 🙏@ChennaiIPL and @gujarat_titans will be wearing black armbands to pay their respects to Andrew Symonds. pic.twitter.com/X9bLS3mrvO
अपघातात गमावला जीव
ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचे वयाच्या 46व्या वर्षी निधन झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या कारला शनिवारी रात्री 10.30च्या सुमारास टाऊन्सविलेच्या पश्चिमेला 50 किमी अंतरावर असलेल्या हर्वे रेंजमध्ये अपघात झाला. या अपघातात सायमंड्सचे निधन झाले आहे. डॉक्टरांनी सायमंड्सला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा अँड्र्यूला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्नचंही निधन झालं.
CSK and Gujarat Titans players wearing black armbands to pay tribute to Andrew Symonds.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 15, 2022
पहिल्या आयपीएलमधील महागडा विदेशी खेळाडू -
आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 साली सायमंड्स हा सर्वात महागडा परदेशी खेळाडू होता. पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्सनं त्याला 5.4 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. सायमंड्सने पहिल्या हंगामात राजस्थानविरोधात खेळताना 53 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती. डेक्कन चार्जसशिवाय सायमंड्स मुंबई इंडियन्सचाही भाग होता.. 2012 मध्ये सायमंड्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी -
सायमंडसने 26 टेस्ट मॅचमध्ये 1462 रन काढण्याची कामगिरी केली आहे. शिवाय 24 विकेटही घेतल्या आहेत. सायमंड्स 14 टी 20 सामने खेळले. सायमंड्सचं करिअर शानदार होतं. त्याने 198 वनडे सामन्यांमध्ये 5088 धावा केल्या.यामध्ये सहा शतकं आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत 133 विकेट घेतल्या.