एक्स्प्लोर
IPL : चेन्नईची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा पराभव
दुसऱ्या बाजूनं चेन्नईची आठ बाद 113 अशी घसरगुंडी उडाली. पण ड्यू प्लेसीनं एक खिंड लढवून चेन्नईला सनसनाटी विजय मिळवून दिला.
![IPL : चेन्नईची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा पराभव IPL : Chennai enters in finale latest updates IPL : चेन्नईची फायनलमध्ये धडक, हैदराबादचा पराभव](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/22231050/IPL.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : चेन्नई सुपरकिंग्जनं सनरायझर्स हैदराबादचा दोन विकेट्सनी पराभव करून आयपीएलच्या क्लालिफायर वनचा सामना जिंकला. या विजयानं चेन्नईला आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळवून दिलं आहे.
चेन्नईच्या या विजयात फॅफ ड्यू प्लेसीची नाबाद 67 धावांची खेळी निर्णायक ठरली. ड्यू प्लेसीनं 42 चेंडूंमधली ही खेळी पाच चौकार आणि चार षटकारांनी सजवली. शेन वॉटसनच्या साथीनं ड्यू प्लेसी सलामीला मैदानात उतरला होता.
दुसऱ्या बाजूनं चेन्नईची आठ बाद 113 अशी घसरगुंडी उडाली. पण ड्यू प्लेसीनं एक खिंड लढवून चेन्नईला सनसनाटी विजय मिळवून दिला.
त्याआधी, या सामन्यात चेन्नईनं हैदराबादला सात बाद 139 असं रोखून धरलं. सलामीच्या शिखर धवनला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार केन विल्यमसन अवघ्या 24 धावांवर माघारी परतला. त्यानंतरही हैदराबादची घसरगुंडी सुरू राहिली आणि त्यांची अवस्था सहा बाद 88 अशी झाली. त्या कठीण परिस्थितीत कार्लोस ब्रॅथवेटनं 29 चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 43 धावांची खेळी उभारली. त्यामुळं हैदराबादला चेन्नईला 140 धावांचं लक्ष्य देता आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)